सचिन तेंडुलकरचे जवळचे मित्र आणि मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळलेले माजी क्रिकेटपटू विजय शिर्के यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. विजय शिर्के हे ८० च्या दशकात मुंबईकडून सचिन आणि विनोद कांबळी यांच्यासोबत खेळायचे. सचिनने ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सचिनने म्हटलं आहे, मी 15 वर्षाचा असल्यापासून विजय शिर्के यांना ओळखत होतो आणि आम्ही चांगला वेळ घालवला आहे.
त्या आठवणी माझ्याबरोबर कायम राहतील. मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि प्रियजनांच्या दुःखात सहभागी आहे.
Rest in peace Vijay Shirke!
Someone whom I knew from the age of 15 and shared some amazing times with.
Those memories will stay with me forever.
My heartfelt condolences to his family & loved ones. pic.twitter.com/yK2dnvyiWB— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 21, 2020
मुंबई आणि स्थानिक क्लब क्रिकेटमध्ये खेळताना विजय शिर्के नव्या चेंडूवर शानदान गोलंदाजी करायचे. त्यांच्याकडे चेंडू स्विंग करण्याची नैसर्गिक शैली होती. त्यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटने एका चांगल्या खेळाडूला गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.