Prithvi Shaw likely to be dropped for next three Tests - Zaheer Khan

पृथ्वी शॉ ला पुढील तिन्ही टेस्ट मॅचसाठी वगळले जाण्याची शक्यता – झहीर खान

क्रीडा

भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेडच्या टेस्टमध्ये अपयशी ठरला. सलामीला येणाऱ्या फलंदाजाकडून अशी कामगिरी बिलकूल अपेक्षित नाही. याच कारणामुळे पहिल्या टेस्टमध्ये अपयशी ठरलेल्या पृथ्वी शॉ याला पुढील तिन्ही टेस्ट मॅचसाठी वगळले जाण्याची शक्यता आहे, असे भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान म्हणाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पृथ्वी शॉ सलग दोन्ही डावांमध्ये क्लीनबोल्ड झाला. पहिल्या डावात पृथ्वीला स्टार्कने बाद केले तर दुसऱ्या डावात कमिन्सने त्याला बाद केले. पहिल्या डावाच्या दुसऱ्या चेंडूवर आणि दुसऱ्या डावाच्या चौथ्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर पृथ्वी शॉ बाद झाला. दोन्ही वेळा टीमच्या दहापेक्षा कमी धावा फलकावर असताना सलामीवीर पृथ्वी परतला. पृथ्वीच्या फलंदाजीतले दोष ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या लक्षात आले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या कमकुवत बाजू हेरुन त्यांच्यावर आक्रमण करतात. अशा परिस्थितीत पृथ्वीला वगळणे टीमसाठी आवश्यक असल्याचे झहीर खान म्हणाला.

झहीर खानने पृथ्वी शॉ याला अवास्तव महत्त्व दिल्याचे मत व्यक्त केले. पृथ्वी सातत्याने अपयशी होत आहे. नवख्या पृथ्वीला सलामीला पाठवण्याचा टीम मॅनेजमेंटचा निर्णय अनाकलनीय आहे. ऑस्ट्रेलियात जिंकण्यासाठी सलामीची जोडी सक्षम असणे भारताच्या हिताचे आहे. सध्याची कामगिरी बघता पृथ्वी शॉ याला पुढील तीन टेस्टसाठी अंतिम अकरा जणांच्या टीममधून वगळले जाण्याची शक्यता आहे. पृथ्वीपेक्षा सक्षम पर्याय टीमकडे उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत पृथ्वीला वगळून सक्षम खेळाडूंना संधी देणे टीमच्या हिताचे ठरेल, असे मत झहीर खानने व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय टेस्टमध्ये प्रत्येक विकेट महत्त्वाची असते. अशा वेळी पृथ्वीमुळे वारंवार एक विकेट गमावणे भारताला परवडणारे नाही. पर्याय उपलब्ध असताना पृथ्वीला सलामीला खेळवत राहणे भारतासाठी धोक्याचे ठरू शकते. ही बाब विचारात घेतली जाईल आणि टीम मॅनेजमेंट पृथ्वीला पुढील तिन्ही टेस्टसाठी अंतिम अकरा खेळाडूंच्या यादीतून वगळेल, अशी शक्यता झहीर खानने व्यक्त केली.

भारतीय उपखंडात फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यासाठी पाय रोवून उभे राहणे सोपे जाते. या उलट ऑस्ट्रेलियातील वेगवान, उसळत्या खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहणे कठीण आहे. तिथे फलंदाजांना खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी जास्त वेळ मिळणे कठीण आहे. पृथ्वी शॉ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध अपयशी ठरत आहे. त्याला गोलंदाजांसमोर जास्त वेळ उभे राहणे जमत नाही. या वास्तवाचे भान ठेवून टीम मॅनेजमेंट सक्षम पर्यायाचा विचार करेल, असे मत झहीर खानने व्यक्त केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत