मुंबई : मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटपटू कृणाल पांड्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कृणाल पांड्याकडे नियमाप्रमाणे ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त सोने सापडल्यानंतर डीआरआयनं त्याला ताब्यात घेतलं आहे. मुंबई विमानतळावर जास्त सोनं आणल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल संपल्यानंतर कृणाल पांड्या भारतात परतत होता.
