दुबई : मुंबई इंडियन्सने यावर्षीच्या आयपीएलच्या जेतेपदाला देखील गवसणी घातली आहे. या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईच्या संघापुढे १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. पण रोहितच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने हे आव्हान सहजरित्या पेलले आणि जेतेपद पटकावले. मुंबईचे हे पाचवे जेतेपद ठरले, आतापर्यंत आयीएलमध्ये एकाही संघाला पाचवेळा जेतेपद पटकावता आले नाही. मुंबईच्या संघाने पाच विकेट्स राखत सहज जेतेपद मिळवले.
Final. It’s all over! Mumbai Indians won by 5 wickets https://t.co/6kuxVfvInp #MIvDC #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) November 10, 2020
दिल्लीच्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने पहिल्या षटकातच षटकारासह झोकात सुरुवात केली. रोहितने पहिल्याच षटकात षटकार लगावला. त्यानंतर दुसऱ्याच षटकात मुंबईने १८ धावा करत आपले इरादे स्पष्ट केले. मुंबईने पहिल्या चार षटकांमध्ये जवळपास १०च्या धावगतीने धावा केल्या. पण चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मुंबईला पहिला धक्का बसला. मार्कस स्टॉइनिसने आपल्या पहिल्याच चेंडूवर मुंबईच्या क्विंटन डीकॉकला बाद केले. डीकॉकने १२ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २० धावा केल्या.
CHAMPIONS!! #MumbaiIndians #Dream11IPL pic.twitter.com/iJVilrC9WX
— IndianPremierLeague (@IPL) November 10, 2020
मुंबईला पहिला धक्का बसल्यावर रोहित आणि सूर्यकुमार यादव यांची चांगली पार्टनरशिप जमली होती. पण रोहितच्या चुकीमुळे यादवला बाद व्हावे लागले. रोहित चेंडू मारत थेट धाव घेण्यासाठी धावत सुटला. त्याने यादवकडे पाहिले नाही. रोहितने अर्धी खेळपट्टी ओलांडली, पण यादव आपल्या जागेवरच थांबलेला होता. या गोष्टीचा फायदा दिल्लीच्या प्रवीण दुबेने घेतला आणि थेट चेंडू यष्टीरक्षक रिषभ पंतकडे दिला. रिषभने यावेळी सहजपणे यादवला धावचीत केले. यादव बाद होण्याचा धक्का मुंबईला बसला. पण रोहितने दुसऱ्या बाजूने जोरदार फटकेबाजी करत आपले अर्धशतकही पूर्ण केले.
श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मुंबई इंडियन्सपुढे १५७ धावांचे आव्हान ठेवता आले होते. आयपीएलच्या आजच्या अंतिम फेरीत दिल्लीची ३ बाद २२ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर अय्यर आणि पंत या दोघांनी धडाकेबाज खेळी करत मुंबईच्या गोलंदाजीवरच जोरदार हल्ला चढवला. अय्यर आणि पंत या दोघांनी अर्धशतके पूर्ण केली. या दोघांच्या दमदार फटकेबाजीमुळेच दिल्लीला मुंबईपुढे हे सन्मानजनक आव्हान ठेवता आले. श्रेयस अय्यरने यावेळी नाबाद ६५ धावांची धडाकेबाज खेळी केली.
A very well deserved Man of the Match award for @trent_boult ??#Dream11IPL #Final pic.twitter.com/In6vKc6xOZ
— IndianPremierLeague (@IPL) November 10, 2020
- मॅन ऑफ द मॅच – ट्रेंट बोल्ट
- इमर्जिंग प्लेअर – देवदत्त पडिक्कल
- व्हॅल्युएबल प्लेअर – जोफ्रा आर्चर
- पेटीएम फेअरप्ले अॅवॉर्ड – मुंबई इंडियन्स
- सुपर स्ट्रायकर – कायरन पोलार्ड
- मोस्ट सिक्सेस – इशान किशन
- गेम चेंजर – केएल राहुल
- ऑरेंज कॅप – केएल राहुल
- पर्पल कॅप – कगिसो रबाडा