Prices of domestic gas cylinders and petrol-diesel increases

घरगुती गॅस सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले

देश

बजेटनंतर सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याबरोबरच स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीतही वाढ केली आहे. घरगुती स्वयंपाकाच्या १४.२ किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत या सिलेंडरची किंमत ६९४ रुपयांवरुन ७१९ रुपये झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कंपन्यांनी कपात केली आहे. मुंबईत या सिलेंडरच्या किंमतीत पाच रुपयांनी कपात होऊन तो १४८२.५० रुपयांचा झाला आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रण मुक्त करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारानुसार दररोज याचे दर बदलत असतात. त्यानुसार, आज डिझेलच्या किंमतीत ३५ ते ३७ पैशांनी वाढ झाली तर पेट्रोलच्या किंमतीत ३५ ते ३४ पैशांनी वाढ झाली. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलच्या किंमती आजवरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत