Serious allegations against Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi, pornographic video goes viral

कर्नाटकचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोप, अश्लील व्हिडीओ व्हायरल

देश

कर्नाटकचे जलसंपदामंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अश्लील व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीच्या आमिषाने युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. तसेच पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या आक्षेपार्ह वर्तनाची सीडी व्हायरल करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तरुणीच्या कुटुंबीयांनी दिनेश कलहळ्ळी यांच्याकडे मदत मागितल्यानंतर ते पोलिसांत पोहोचले. यावेळी तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. दिनेश कलहळ्ळी यांनी पोलीस आयुक्त कमल पंत यांची भेट घेऊन या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. तक्रारीत दिनेश कलहळ्ळी यांनी सांगितलं कि, “रमेश जारकीहोळी यांनी केपीटीसीएलमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने वारंवार 25 वर्षीय तरुणीचं लैंगिक शोषण केलं. परंतु नंतर तिला नोकरी देण्यास नकार दिला. त्यामुळे तरुणीने त्या दोघांमधील वैयक्तिक क्षण रेकॉर्ड केले. ही बाब समजल्याच रमेश जारकीहोळी यांनी तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.”

मात्र, हे संवेदनशील प्रकरण असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यापूर्वी आम्ही अंतर्गत चौकशी करु, असं पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पूर्वी काँग्रेसचे नेते असलेल्या रमेश जरकीहोळी यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत भाजपला पाठिंबा दिला होता. त्यांचा कर्नाटकात भाजपची सत्ता आणण्यात मोठा वाटा आहे. रमेश जरकीहोळी यांचा भाऊ असलेले कर्नाटक दूध महासंघाचे अध्यक्ष बालाचंद्र जरकीहोळी यांनी यासंदर्भात आज (बुधवार) मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांची भेट घेतली आणि या प्रकरणात सीआयडी किंवा सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

रमेश जारकीहोळी यांची प्रतिक्रिया :

त्या सीडीची चौकशी होऊ द्या. चूक असेल तर मला फाशी द्या, अशी प्रतिक्रिया रमेश जारकीहोळी यांनी या प्रकरणावर दिली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत