कर्नाटकचे जलसंपदामंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अश्लील व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीच्या आमिषाने युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. तसेच पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या आक्षेपार्ह वर्तनाची सीडी व्हायरल करण्यात आली आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी दिनेश कलहळ्ळी यांच्याकडे मदत मागितल्यानंतर ते पोलिसांत पोहोचले. […]

