Delhi-Bound SpiceJet Flight Returns to Patna as Engine Catches Fire After Takeoff
देश

ब्रेकिंग! स्पाइसजेट विमानाच्या इंजिनला उड्डाणानंतर लागली आग, इमर्जन्सी लँडिंग, सर्व 185 प्रवासी सुरक्षित

पाटणा : पाटण्यात स्पाइसजेटच्या विमानाचा भीषण अपघात थोडक्यात टळला. पाटणा विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या प्रवासी विमानाच्या इंजिनला अचानक आग लागली, त्यामुळे त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाने रविवारी पाटणाहून दिल्लीला उड्डाण घेतल्यानंतर लगेचच आग लागली. SG723 फ्लाइट उड्डाणानंतर लगेचच सुरक्षितपणे लॅन्ड करण्यात आली. विमानातील सर्व 185 प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानात आग लागली अशी माहिती मिळाली आहे.

उड्डाणानंतर लगेचच आग लागल्याने प्रवाशांमध्ये तसेच विमानतळावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घाईघाईत अग्निशमन दलाचे पथकही विमानतळावर पोहोचले. घटनेचे कारण शोधले जात आहे. विमानातील सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले आहे. तपास पथकाने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. रिपोर्टनुसार, या विमानाने पाटणाच्या जयप्रकाश आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 12.10 वाजता उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच या विमानाच्या पंख्याला आग लागली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत