Sanjay Rathore arrives at Varsha Bungalow for CM's visit

संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पोहोचलाच नाही

महाराष्ट्र

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात मंत्री संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, तीन दिवस उलटूनही त्यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कायदेशीरपणे संजय राठोड अद्यापही वनमंत्री पदावर कायम आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर राजीनाम्याचा स्वीकार करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सर्व बाजूने टीका होत होती. तसेच पोहोरादेवी येथे राठोड यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत नाराजी होती. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर २० दिवसांनी संजय राठोड यांनी पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, त्यांचा राजीनामा अजूनही राज्यपालांकडे पोहोचलाच नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत