Rekha Jare

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची धारदार शस्त्राने हत्या

महाराष्ट्र राजकारण

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे अनेकांना मोठा धक्का बसला असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे. रेखा जरे, त्यांचा मुलगा, त्यांची आई तसेच डॉ. माने या पुण्याहून काम उरकून येत असताना जतेगाव घाटात ही घटना घडली. कारची काच एका दुचाकीला लागल्यामुळे वाद झाला. त्या वादातूनच रेखा जरे यांच्या मानेवर वार करण्यात आले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती जरे यांच्या मुलाने पोलिसांना दिली आहे. दुचाकीवर दोन जण होते. ते नेमके को होते, याबाबत अधिक तपशील अजून मिळालेला नाही, असे ढुमे यांनी स्पष्ट केले. गाडीला कट मारल्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत