according to research The corona virus travels from the nose to the brain

कोरोनाचा विषाणू नाकावाटे थेट मेंदूपर्यंत जातो, संशोधनात समोर आली माहिती

कोरोना

कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध पातळीवर संशोधन सुरु आहे. त्यातच आता नवीन संशोधनानुसार, कोरोनाचा विषाणू नाकावाटे थेट मेंदूपर्यंत जातो आणि संपूर्ण शरीरावर परिणाम करत असल्याचे समोर आले आहे. ‘नेचर न्यूरोसायन्स’ या नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या संशोधनात कोरोनाचा विषाणू शरीराच्या विविध अवयवांपर्यंत कसा जातो याबाबतची निरीक्षणे नोंदवली आहेत. वास न येणे, चव नसणे, डोकेदुखी, थकवा अशा प्रकारची लक्षणे संबंधित रुग्णाला थेट मेंदूपर्यंत कोरोना विषाणू पोहोचल्यानेच दिसू लागतात. या संशोधनामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणे काय आहेत तसेच त्यांच्यावर उपचार कसे करावे याबाबत मदत मिळेल.

जर्मनीतील चारिटे विद्यापीठातील संशोधकांनी श्वासनलिकेची घश्याच्या वरच्या भागापासून ते नाकापर्यंत तपासणी केली. या संशोधनात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३३ रुग्णांचा देखील समावेश होता. यामध्ये ११ महिला आणि २२ पुरुष होते. मृतांचे सरासरी वय हे ७१.६ टक्के होते. कोरोनाची लक्षणे आढळण्यापासून मृत्यू होईपर्यंत सरासरी ३१ दिवस ते जगले. संशोधकांना मेंदू आणि श्वसन नलिकेत सार्स-सीओव्ही२ आरएनए आणि प्रोटीन आढळले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत