100 percent of the funds of the District Annual Plan should be spent within the prescribed time - Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil
महाराष्ट्र सोलापूर

जिल्हा वार्षिक योजनेचा 100 टक्के निधी विहित वेळेत खर्च करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकरी व सर्व समाज घटकांना न्याय मिळणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे सर्व विभागांनी कामे प्रस्तावित करावीत. नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणारा निधी विहित वेळेत व 100 टक्के खर्च करा, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जिल्हा नियोजन वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन भवन सभागृह येथे झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधला जावा. पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. त्यामुळे हा निधी 100 टक्के खर्च व्हावा, यासाठी प्रत्येक खाते प्रमुखाने नियोजन करावे. 2021-22 च्या मंजूर कामांकरिता दायित्व निधीची मागणी केली नसल्यास तातडीने दायित्व निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावेत. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या पार्शवभूमीवर 2022-23 साठी प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने निधी मागणी प्रस्ताव सादर करावेत. आय पास प्रणालीचा प्रभावी वापर करावा. तसेच परफॉर्मन्स व सोशल ऑडिट करावे. मिळणारा प्रत्येक पैसा सामान्यांच्या कल्याणासाठी खर्च होईल, यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. तसेच सौर ऊर्जेचा वापर होण्याच्या अवलंब करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नियोजन समितीच्या माध्यमातून प्रस्तावित कामे व निधीची मागणी यांची माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022-23 करिता सोलापूर जिल्ह्याकरिता 527 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी विविध खाते प्रमुखांनी त्यांच्या विभागामार्फत प्रस्तावित कामे, त्यासंबंधीच्या मान्यता, सद्यस्थिती यांची माहिती दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत