Ban on drones, paragliders etc. at Mumbai Police Commissionerate
महाराष्ट्र मुंबई

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन, पॅराग्लायडर वापरावर बंदी

मुंबई : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधी कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, पॅराग्लायडर, हॅण्ड ग्लायडर हॉट एअर बलून यांच्या वापराबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. दि. 12 डिसेंबर 2022 पर्यंत हे लागू असल्याचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी कळविले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवू नये याकरीता हे आदेश लागू करण्यात आले आहेत. तथापि, ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे अशांसाठी हा आदेश शिथिल असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशामध्ये स्पष्ट केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत