सिंधुदुर्ग: कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाच पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी गेले होते, त्यात पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे ते बुडाले. या घटनेत दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून, तीन पर्यटकांचे प्राण वाचवण्यात वॉटर स्पोर्ट्सच्या तरुणांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
पुणे येथील हे पर्यटक तारकर्ली समुद्रकिनारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पोहण्यासाठी उतरले होते. पोहण्याच्या वेळी पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे ते बुडू लागले. हे दृश्य वॉटर स्पोर्ट्सच्या तरुणांनी पाहिलं आणि तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांचा बचाव कार्यामुळे तिघांचा जीव वाचवला, पण दुर्दैवाने दोघांना वाचवता आले नाही.
मृत्यू झालेल्या पर्यटकांची ओळख: शुभम सुशील सोनवणे (हडपसर, पुणे), रोहित बाळासाहेब कोळी (हडपसर, पुणे)
घटनेतील अन्य तीन पर्यटकांना वाचवण्यात वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचारी झिलू चव्हाण, निलेश राऊळ, नरेश टिकम, राजन तारी, भाई आजगावकर, कुमार राठोड, प्रतीक कुबल, कौशल कुबल, प्रथमेश कुबल, रोहित कुबल, हर्षल कुबल, महेश कुबल, सर्वेश धुरत, वैभव तळवडकर, दिलीप बांदेकर, नागेश देऊलकर आणि निहाल आडकर यांची मदत झाली.
प्रथमेश कुबल यांनी दाखवली साहसाची पराकाष्ठा:
प्रथमेश कुबल या तरुणाने आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्याच्या तळाशी जाऊन एक पर्यटक वाचवला. त्याच्यासोबत जय गणेश स्कुबा, गजानन स्कुबा आणि विक्रांत स्कुबा यांनी देखील महत्त्वाची मदत केली, ज्यामुळे तिघांचा जीव वाचवला. मालवण तालुका प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले आणि मदत कार्य सुरू केलं. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.