मुंबई : श्रीवर्धनच्या धर्तीवर दिवेआगर समुद्र किनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार असून, आधुनिक सुविधा, संग्रहालय तसेच स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत हा किनारा लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. दिवेआगर समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, दिवेआगर […]
टॅग: Maharashtra tourism
विकसित महाराष्ट्र – २०४७ व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता, अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हिजन मॅनेंजमेंट युनिट
मुंबई : राज्यातील नागरिकांकडून विकसित महाराष्ट्र – २०४७ संदर्भात मते, अपेक्षा, अभिप्राय, आकांक्षा व प्राधान्यक्रम जाणून घेण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या मदतीने राज्यव्यापी सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. या आधारे तयार करण्यात आलेल्या विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला तसेच त्याच्या अंमलबजावणीसाठी व्हिजन मॅनेजमेंट युनिट स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र […]
के-हार्मनी फेस्टा : भारत-कोरिया मैत्री आणि संस्कृतीचा महोत्सव
मुंबई : कोरिया प्रजासत्ताकाचा वाणिज्य दूतावास आणि महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या साहाय्याने मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह, वांद्रे कुर्ला संकुल येथे रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘के-हार्मनी फेस्टा’चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात मुंबईकरांना भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील वाढत्या सांस्कृतिक आणि पर्यटन संबंधांचा अनुभव घेता आला. महोत्सवात ‘सोलस्ट्रीट’ या संकल्पनेत सोल शहरामधील प्रसिद्ध भागांची प्रतिकृती […]
बीडच्या प्राचीन कंकालेश्वर मंदिराच्या जतन, दुरुस्तीसाठी ९ कोटी १४ लक्ष रकमेस प्रशासकीय मान्यता
मुंबई : कंकालेश्वर मंदिर, ता. जि. बीड या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन, दुरुस्ती कामासाठी येणाऱ्या ९,१४,५४,४०३/- (रु.नऊ कोटी चौदा लक्ष चौपन्न हजार चारशे तीन मात्र) इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. या संदर्भातील शासन निर्णय 202509241733017823 सांस्कृतिक व पर्यटन पर्यटन विभागाने जारी केला […]
रामटेक तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना वेळेत पूर्ण करा – वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
नागपूर : विदर्भातील पर्यटन आणि तिर्थक्षेत्रात रामटेकचे अनन्य साधारण महत्व असून याठिकाणी स्थानिकांना रोजगार निर्मितीची विविध संसाधणे उपलब्ध होण्यासाठी रामटेक तिर्थक्षेत्र विकास आराखडा आपण तयार केला आहे. या आराखड्यामध्ये रोपवेची सुविधा, सर्व सुविधायुक्त यात्री निवास, स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणारी गडमंदिर परिसरात नियोजनबद्ध दुकानांची गाळे, भव्य पार्कीग सुविधा आदी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. याला […]
तारकर्ली समुद्र किनारी दुर्दैवी घटना, ५ पर्यटक बुडाले; वॉटर स्पोर्ट्सच्या तरुणांच्या मदतीने तिघांचा जीव वाचला
सिंधुदुर्ग: कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाच पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी गेले होते, त्यात पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे ते बुडाले. या घटनेत दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून, तीन पर्यटकांचे प्राण वाचवण्यात वॉटर स्पोर्ट्सच्या तरुणांनी महत्त्वाची भूमिका निभावली. पुणे येथील हे पर्यटक तारकर्ली समुद्रकिनारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पोहण्यासाठी उतरले होते. पोहण्याच्या […]






