Sanjay Rathore arrives at Varsha Bungalow for CM's visit

संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पोहोचलाच नाही

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात मंत्री संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, तीन दिवस उलटूनही त्यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कायदेशीरपणे संजय राठोड अद्यापही वनमंत्री पदावर कायम आहेत. दरम्यान, संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर राजीनाम्याचा स्वीकार करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे […]

अधिक वाचा
Udayan Raje Bhosale

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत उदयनराजे भोसले यांची रोखठोक प्रतिक्रिया…

मुंबई : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, भारतात लोकशाही आहे. लोकशाहीत आपण मतदार प्रतिनिधींची निवड करत असतो. त्यामुळे प्रतिनिधींनी जबाबदारीचं भान ठेवून वागायला हवं. पूजा चव्हाण प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायला हवी. कायद्या समोर सर्वजण समान असतात. उदयनराजे आज मनसे अध्यक्ष […]

अधिक वाचा
in pooja chavan death case chitra wagh questioned chief minister

मुख्यमंत्री साहेब, खुर्ची एवढी वाईट आहे का? चित्रा वाघ यांचा सवाल

नाशिक : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात 21 दिवस झाले तरी अद्याप एफआयआर दाखल झाली नाही. सरकार, पोलिस प्रशासन बलात्काऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सगळे पुरावे असतानाही पोलीस आणि सरकार कशाची वाट पाहत आहे. मला विश्वास आहे की, आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्लं असतं. मुख्यमंत्री साहेब, खरंच खुर्ची […]

अधिक वाचा
19 people including mahants of Pohardevi infected with corona

पोहरादेवी येथील महंतांसह 19 जणांना कोरोनाची लागण, ‘त्या’ हजारो जणांचं काय होणार?

वाशिम : पोहरादेवी येथे दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणहून हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. येथे कोरोना नियमांचे उल्लंघन झाले होते. या गर्दीतून कोरोना संक्रमणाची मोठी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे येथे जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता. आता पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण 19 जणांना […]

अधिक वाचा
Sanjay Rathore arrives at Varsha Bungalow for CM's visit

संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल, मंत्रिपद धोक्यात?

मुंबई : वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. काही वेळापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक पार पडली, त्यावेळी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांसह वनमंत्री संजय राठोडही उपस्थित होते. कॅबिनेट बैठकीनंतर वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. वर्षा बंगल्यावर सर्व शिवसेना नेत्यांची बैठक सुरु असल्यामुळे संजय राठोड यांच्याबद्दल काय निर्णय घेतला […]

अधिक वाचा
Sanjay Rathore

मोठी बातमी : संजय राठोड यांचा अखेर राजीनामा… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा स्वीकारणार की नाकारणार याकडे लक्ष

मुंबई : वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा मातोश्रीवर पाठवला आहे. ते पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याचे सांगितले […]

अधिक वाचा
State Home Minister Anil Deshmukh's big statement in Pooja Chavan suicide case

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं विधान

नागपूर : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वन मंत्री संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणी राठोड यांचीही चौकशी होणार, हे स्पष्ट झालं आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. चौकशी अहवाल आल्यावर सत्य निष्पन्न होईल, असं […]

अधिक वाचा