two-year-old girl stabbed to death with blade by her father

भयंकर : वडिलांनी केली दोन वर्षांच्या चिमुकलीची ब्लेडने गळा चिरून हत्या

नागपूर महाराष्ट्र

नागपूर : वडिलांनी दोन वर्षांच्या चिमुकलीची ब्लेडने गळा चिरून हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. बुटीबोरीतील गणेशपूर परिसरात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. त्यानंतर या व्यक्तीने स्वत:च्याही गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. राधिका किशोर सोयाम, असे मृत चिमुकलीचे तर किशोर सुखदेव सोयाम (वय २६) असे वडिलांचे नाव आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी किशोर आणि पूजा यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर दोन वर्षांत त्यांना मुलगी देखील झाली होती. मात्र, किशोर पूजाच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला होता. त्यावरून दोघांमध्ये खटके उडत होते. सोमवारी दुपारी किशोर दारू पिऊन आला आणि त्याने पूजाला मारहाण केली. याबाबत तक्रार देण्यासाठी पूजा बुटीबोरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गेली.

दरम्यान, किशोरने पूजाच्या मोबाइलवर संपर्क साधून तिला धमकी दिली की पोलिसांत तक्रार दिली तर तुला व मुलीला ठार मारेन. त्यानंतर किशोरने रंगाच्या भरात ब्लेडने चिमुकल्या राधिकाचा गळा चिरला. त्यानंतर किशोरने स्वत:च्याही गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पूजा पोलिसांसह घरी आली तेव्हा राधिका व किशोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. दोघांनाही तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी राधिकाला तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत