मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
टॅग: Governor
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व […]
शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने विचार करावा, राज्यपालांची आरोग्य विभागाला सूचना
मुंबई : रुग्ण दगावला आणि शव नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध नसली, तर ग्रामीण भागात रुग्णाच्या नातलगांना नाईलाजाने शव उचलून न्यावे लागते. त्यामुळे राज्याने मृत व्यक्तींना नेण्यासाठी शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली. राज्यपाल बैस यांनी राजभवन येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक […]
व्यसनमुक्तीवरील तुमच्या कार्याचा व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी नक्की फायदा होईल, डॉ. सोमनाथ गिते यांचे राज्यपालांकडून कौतुक
पुणे : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नुकतेच पुण्यात आले होते. यावेळी डॉ. सोमनाथ गिते यांनी त्यांची भेट घेतली आणि व्यसनमुक्ती या विषयावर चर्चा केली. राज्यपालांनी डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याचे कौतुक केले व प्रशंसापत्र दिले. तसेच व्यसनमुक्तीचे कार्य आवश्यक असून हे कार्य असेच सुरु ठेवा, व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी तुमच्या कार्याचा नक्की फायदा होईल, असेही […]
राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग कल्याण ध्वजनिधी संकलन मोहिमेचा शुभारंभ
मुंबई : ‘नॅब’ ही संस्था दृष्टिबाधित, बहुविकलांग व्यक्तींना रोजगार प्रशिक्षण देण्याचे तसेच दिव्यांग मुलामुलींना शिक्षण उपलब्ध करून देण्याचे पुण्यकार्य करीत आहे. ‘नॅब’ संस्थेच्या समस्यांबाबत आपण शासनस्तरावर बैठकीचे आयोजन करून समस्यांचे निराकरण करू, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले. ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ (नॅब ) संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्यावतीने आयोजित दिव्यांग कल्याण ध्वजदिन निधी संकलन […]
अग्निपथ योजनेबद्दल जनजागृती करणाऱ्या चित्रपटाचा मुहूर्त राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न
मुंबई : केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तयार होत असलेल्या ‘भारत के अग्निवीर’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा तसेच पोस्टरचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. हा चित्रपट विविध भारतीय भाषांमध्ये तयार करण्यात येणार आहे. महंत रवींद्र पुरी क्रिएशन्स व सत्य ऑनलाईन प्रॉडक्शनद्वारे तयार होत असलेल्या या चित्रपटाच्या […]
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना राज्यात सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिल्याच्या निर्णयाविरुद्ध शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे सरचिटणीस सुभाष देसाई यांनी याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात आधीच प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र संकटाशी संबंधित इतर प्रकरणांसह या प्रकरणावर ११ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाने […]
ब्रिटिशकालीन कालबाह्य कायदे बदलले जावे, राज्यपालांचे आग्रही प्रतिपादन
मुंबई : स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे होत आहेत, तरीदेखील आपल्या देशात अनेक ब्रिटिशकालीन कायदे अस्तित्वात आहेत. हे कालबाह्य कायदे बदलण्याची गरज असून त्यासाठी एक समग्र आढावा घेण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज केले. जुहू विले पार्ले मुंबई येथील मा कानबाई विद्याधाम या संस्थेने सुरु केलेल्या अधिया विधी महाविद्यालयाचे उद्घाटन […]
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०’ लॅबचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या ‘सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०’ (सी4आय4 लॅब) च्या ‘एसएमई प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड ॲनेलिटीक्स लॅब’चे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी, किर्लोस्कर उद्योग समूहाचे उद्योगपती राहुल किर्लोस्कर, कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, लॅबचे संचालक दत्तात्रय नवलगुंदकर आदी उपस्थित होते. […]
राजभवन येथील शोकसभेत राज्यपालांची जनरल बिपीन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : उत्तराखंडचे सुपुत्र असलेले जनरल बिपीन रावत हे द्रष्टे सरसेनापती होते. भारतीय सैन्य दलांच्या आधुनिकीकरणाचे त्यांनी सुरु केलेले कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. तिन्ही सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवारी राजभवन येथे एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले […]