leaders stopped at ghazipur border

सुप्रिया सुळेंसहीत १५ खासदारांना पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यापासून रोखलं

देश

नवी दिल्ली : केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज ७२ वा दिवस आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या विरोधी पक्षाच्या १५ खासदारांना पोलिसांकडून गाझीपूर सीमेवरच अडवण्यात आलं आहे. या खासदारांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यापासून अडवण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शिरोमणी अकाली दल (SAD), द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि तृणमूल काँग्रेससहीत इतर पक्षांचे १५ खासदार गाझीपूर सीमेवर दाखल झाले होते. आंदोलनावर बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न या खासदारांकडून करण्यात आला. परंतु, नेत्यांना पोलिसांनी बॅरिकेडिंग पार करून आंदोलन स्थळावर जाण्याची आणि शेतकऱ्यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट न घेताच त्यांना माघारी परतावं लागलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत