1 जानेवारी 2021 पासून देशात कोणत्याही लँडलाइन फोनवरुन मोबाईल नंबरवर फोन करण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल होत आहे. ट्राय (Telecom Regulatory Authority of India – TRAI) च्या आदेशानुसार लँडलाइनवरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठी मोबाईल नंबरआधी शून्य हा क्रमांक डायल करावा लागेल. ट्रायने याबाबत दूरसंचार विभागाला शिफारस केली होती. दूरसंचार विभागाने ट्रायची शिफारस स्वीकारली असून टेलिकॉम कंपन्यांना एक […]
तंत्रज्ञान
Stay updated with the latest technology news from Maharashtra and India. Our Technology section covers everything from new tech innovations, gadget launches, software updates, to breakthroughs in AI, IoT, and more, keeping you at the forefront of the digital world.
डिजिटल स्ट्राईक : केंद्र सरकारने आज ‘ह्या’ ४३ मोबाइल अॅप्सवर घातली बंदी
केंद्र सरकारने देशाची सुरक्षेला धोका निर्माण करू पाहणाऱ्या ४३ मोबाइल अॅप्सवर बंदी घातली आहे. भारतातील सुरक्षा, संरक्षण आणि सांप्रदायिकतेला धोका निर्माण करणाऱ्या अॅप्सला भारत बंदी घालत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. आज बंदी घातलेले मोबाइल अॅप्स : १) AliSuppliers Mobile App २) Alibaba Workbench ३) AliExpress – Smarter Shopping, Better Living ४) Alipay Cashier ५) […]
TikTok युझर्स साठी आनंदाची बातमी, PUBG नंतर आता परतणार TikTok
केंद्र सरकारने बंदी आणलेला पबजी हा मोबाईल गेम भारतात परतणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यातच आता भारतात बॅन असलेलं टिकटॉक हे अॅपदेखील परतण्याची शक्यता आहे. टिकटॉकची मालकी असलेली कंपनी बाईटडान्सची सरकारसोबत बातचित सुरु आहे. कंपनीचे टिकटॉक अॅप पुन्हा भारतात लाँच करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. टिकटॉक बॅन केल्यानंतर बाईटडान्स कंपनीने त्यांच्या भारतातील एकाही कर्मचाऱ्याला […]
Samsung Galaxy Note 10 वर २७ हजार ६९५ रुपयांची मोठी सूट, जाणून घ्या
सॅमसंगने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या अनेक स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर्सची घोषणा केली आहे. ज्यात Samsung Galaxy Note 10 वर देखील बेस्ट डील मिळत आहे. सॅमसंगने गॅलेक्सी नोटच्या किंमतीत २७ हजार ६९५ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता या फोनची किंमत ४५ हजार रुपये झाली आहे. ऑफलाइन किंवा रिटेलवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हा फोन कमी किंमतीत मिळणार आहे. […]
Infinix Smart 4 आज पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
Infinix ने नुकताच आपला बजेट फोन Infinix Smart 4 भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनचा पहिला सेल आज (८ नोव्हेंबर) रोजी सुरू होणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर दुपारी १२ वाजता हा हँडसेट सेलसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. इनफिनिक्स स्मार्ट ४ हा फोन भारतात ६ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आला आहे. फोन मिडनाइट ब्लॅक, […]
अभिमानास्पद : इस्रोकडून ‘अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट’चं यशस्वी प्रक्षेपण, अंतराळातून ठेवणार शत्रूंवर नजर
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO) ने अंतराळ क्षेत्रात एक मोठी कामगिरी केली आहे. दुपारी 3 वाजून 12 मिनिटांनी इस्रोने आपला ‘अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट’ EOS-01चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या स्पेस स्टेंटरवरुन EOS-01 सॅटेलाईटचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या काळात भारताने प्रथमच आपलं सॅटेलाईट अंतराळात प्रक्षेपित केलं आहे. पीएसएलव्ही-सी49 […]
Samsung Galaxy M21s स्मार्टफोन लाँच
Samsung Galaxy M21s स्मार्टफोन ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आला आहे. दक्षिण कोरियाची कंपनी गॅलेक्सी एम सीरीजचा हा लेटेस्ट फोन आहे. गेल्या महिन्यात भारतात लाँच करण्यात आलेल्या सॅमसंग गॅलेक्सी एफ ४१ चे हे रिब्रँडेड व्हर्जन आहे. दोन्ही फोन मध्ये स्टोरेजचा फरक आहे. Samsung Galaxy M21s ची किंमत ब्राझीलमध्ये जवळपास २० हजार ५०० रुपये आहे. हा फोन ४ […]
Royal Enfield : रॉयल एनफील्डने Meteor 350 भारतात केली लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
रॉयल एनफील्डने Meteor 350 लाँच केली आहे. आज (६ नोव्हेंबर) व्हर्च्यूअल लाँच इव्हेंटमध्ये ह्या बाईकच्या किंमतीची घोषणा करण्यात आली आहे. Fireball, Stellar आणि Supernova यासारख्या 3 व्हेरियंटमध्ये ही बाईक लॉन्च करण्यात आली आहे. Meteor ३५० ची बुकिंग सुरू करण्यात आली आहे. Royal Enfield Meteor 350 ची सुरुवातीची व्हेरियंट Fireball ची किंमत १ लाख ७५ हजार […]
रोबोट करणार कोविड निर्जंतुकीकरण, UV-360 सॅनिटायझर मॉड्युल रोबोटचे ई-उद्घाटन
कोविडचा सामना करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यात महाराष्ट्र राज्यातील तंत्रज्ञ काम करीत असून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकाराने तयार केलेले युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट उपयुक्त ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. सध्या हा रोबोट नागपुरात ठेवण्यात आला असून त्याचे ई-उद्घाटन मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत झाले. उदय सामंत म्हणाले कि, रुग्णालये, […]










