श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO) ने अंतराळ क्षेत्रात एक मोठी कामगिरी केली आहे. दुपारी 3 वाजून 12 मिनिटांनी इस्रोने आपला ‘अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट’ EOS-01चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या स्पेस स्टेंटरवरुन EOS-01 सॅटेलाईटचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसच्या काळात भारताने प्रथमच आपलं सॅटेलाईट अंतराळात प्रक्षेपित केलं आहे. पीएसएलव्ही-सी49 (PSLV-C49)च्या माध्यमातून EOS-01 आणि इतर 9 कमर्शिअल सॅटेलाईटचे अंतराळात प्रक्षेपण करण्यात आले. यासोबतच रिसॅट -2 बीआर-2 सह इतर वाणिज्यक सॅटेलाईट्सचं प्रक्षेपण अंतराळात करण्यात आलं. डिसेंबर २०२० मध्ये पीएसएलव्ही सी-50 आणि जानेवारी 2021 मध्ये जीसॅट-12आर यांचं अंतराळात प्रक्षेपण केलं जाणार आहे.
Watch Live: Launch of EOS-01 and 9 customer satellites by PSLV-49 https://t.co/H4jE2fUhNQ
— ISRO (@isro) November 7, 2020
ईओएस-01 (EOS-01) अर्थ ऑब्झर्व्हेशन रिसेट सॅटेलाईटचं अॅडव्हान्स सीरीज आहे. यामध्ये सिंथेटिक अॅपर्चर रडार (SAR) लावण्यात आले आहे. जे कुठल्याही वेळी आणि कुठल्याही वातावरणात पृथ्वीवर लक्ष ठेवू शकेल. या उपग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्याद्वारे ढगांच्या आड असतानाही पृथ्वीवर लक्ष ठेवून स्पष्ट चित्र दिले जाऊ शकते. याचा फायदा भारतीय लष्करालाही होणार आहे. ईओएस-01 अंतराळातून असे फोटोज क्लिक करेल जे इतर उपग्रहांना शक्य नाही. हा उपग्रह सीमेवरील शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेऊन अचूक माहिती देऊ शकेल.