मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख सर्वांच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात बराच काळ रुग्णालयात होते. आता अशी काही कागदपत्रे पुढे आली आहेत, ज्यावरून असे दिसून येत आहे की या काळात अनिल देशमुख यांनी चार्टर्ड फ्लाईट मध्ये प्रवास […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालाच नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला झालेल्या दुखापतीबद्दलच्या अहवालानंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबतीत अनेक वेगवेगळ्या अहवालांच्या आधारे निवडणूक आयोग या निष्कर्षापर्यंत पोहोचला आहे की ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालेला नाही, त्याबाबत कोणताही पुरावा मिळालेला नाही. म्हणजेच नंदीग्राममध्ये ममता यांच्या पायाला झालेली जखम हा एक अपघात होता. ममता बॅनर्जी जखमी झाल्यानंतर निवडणूक आयोगाने […]
ब्रेकिंग : निवडणूक आयोगाचा आदेश, पंतप्रधान मोदींचा ‘तो’ फोटो 72 तासात काढून टाका
निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस (TMC) च्या तक्रारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लस घेतानाच फोटो आणि व्हिडिओ येत्या ७२ तासांत निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून हटवण्याचे आदेश दिले आहेत. टीएमसीने निवडणूक आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत हे भाजपचे सेल्फ प्रमोशन असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल पंपांसह अनेक सार्वजनिक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लस घेतानाचा फोटोंचे […]
पंतप्रधान मोदी फार सरळमार्गी नेते, राष्ट्रीय एकात्मता फक्त काँग्रेसचा मक्ता नाही – संजय राऊत
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गळ्यात आसामी पद्धतीचा गमछा घातला होता. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या नर्सेसकडून कोरोना लस टोचून घेतली, त्यापैकी पी. निवेदा या पुदुचेरीच्या आहेत. तर दुसरी नर्स ही केरळमधील होती. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी प्रतिकात्मक राजकारण करण्याचा […]
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी केल्याने विरोधी पक्ष आक्रमक; फडणवीसांनी केला ‘हे’ गंभीर आरोप
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत घेणार असा निर्णय झाला. बैठकीवर विरोधी पक्षाचे नेते पक्षनेते देवेंद्र फडणवीस निषेध नोंदवून बाहेर पडले त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हटले कि जनतेच्या प्रश्नावर या सरकारला काहीही देणेघेणे नाही. भ्रष्टाचार समोर येईल म्हणूनच हा पळपुटेपणा […]
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी सोडलं मौन
वाशिम : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे आज दोन आठवड्यानंतर समोर आले आहेत. संजय राठोड यांनी आज याबाबत मौन सोडत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ‘पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या आडून माझी सामाजिक आणि राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असं ते म्हणाले. राठोड यांनी आज पोहरादेवी गडावर पत्रकार […]
काँग्रेसला मोठा धक्का, पुदुच्चेरीत काँग्रेसचं सरकार कोसळलं
पुदुच्चेरी : पुदुच्चेरीत विधानसभेत व्ही नारायणसामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं आहे. यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी नव्या नायब राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला, अशी माहिती मिळत. त्यामुळे काँग्रेस – डीएमके आघाडीचं सरकार कोसळलं. हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. विश्वासदर्शक ठरावादरम्यान काँग्रेस आणि डीएमकेच्या आमदारांनी ‘वॉक आऊट’ करत सदनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. […]
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. ते ट्विट करत म्हणाले कि, “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.” तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व […]
..कारण आमचे प्रपंच राजकारणावर चालत नाहीत, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निशाण्यावर नक्की कोण?
पारनेर : विखे घराण्याने कधीही राजकारणात सेटलमेंट केली नाही. आम्ही जनतेसाठी राजकारण करीत आहोत. सामान्य जनतेसाठी कितीही नुकसान झाले तरी काही फरक पडत नाही, कारण आमचे प्रपंच राजकारणावर चालत नाहीत. जिल्हयातील राजकीय नेत्यांना सेटलमेंटची सवय लागली आहे.” असा टोला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे. ते जिल्हा बॅंक निवडणुकीनिमित्त बोलत होते. जिल्हा बॅंक […]
जयंत पाटील यांना कोरोनाची लागण
सांगली : राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा तात्पुरती स्थगित केली जाण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटलं कि, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच […]










