दिल्ली : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या रुग्णांना इतर रुग्णांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे रुग्णालयांना अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असून पुरवठा कमी होत आहे. अनेक रुग्णालय ऑक्सिजनसाठी विचारणा करत आहेत. अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने विशाखापट्टणमच्या आरआयएनएल प्लांटमधून महाराष्ट्राला आता दररोज ९७ मेट्रिक टन लिक्विड […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
ब्रेकिंग : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. ए. के. वालिया यांचे कोरोनामुळे निधन
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात सामान्य जनतेपासून ते नेतेमंडळी कोरोना विषाणूच्या विळख्यात येत आहेत. भारतात दररोज २,००० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री डॉ. एके वालिया यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रूग्णालयात उपचार […]
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग करोना पॉझिटिव्ह; एम्स रूग्णालयात दाखल…
दिल्ली : केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसत आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. Dear Dr. Manmohan Singh Ji, Wishing you a speedy recovery. India needs your guidance and advice in this difficult time. — Rahul Gandhi […]
देवेंद्र फडणवीसांना भोवणार ‘ते’ प्रकरण? गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले कारवाईचे संकेत…
मुंबई : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी प्रकरणी पोलिस ठाण्याला भेट देत पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेणे फडणवीस यांना अडचणीचे ठरू शकते. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला असून हा सरकारी कामातील हस्तक्षेप आहे. या प्रकरणी काय कारवाई करता येईल याबाबतचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे. गृहमंत्री दिलीप […]
दिलासादायक! काँग्रेसकडून कोरोनाच्या कठीण काळात नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी हॅलो काँग्रेस कोविड हेल्पलाइन सुरु…
पुणे : पुणे शहरातील नागरिकांसाठी काँग्रेस भवन येथे हॅलो काँग्रेस कोविड हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. यानिमित्त आज काँग्रेस भवन येथे संकेत गलांडे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विद्यार्थी काँग्रेस यांनी उपस्थित राहून अनेक नागरिकांसोबत संवाद साधला. संकेत गलांडे म्हणाले कि, “आयसोलेशन बेड, ऑक्सीजन बेड, इंजेक्शन व कोरोना संदर्भात अनेक अडचणी सध्या नागरिकांना येत आहेत. त्या सर्व […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, २-3 दिवसांत रुग्णालयातून घरी सोडणार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. मात्र, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा […]
लॉकडाऊनवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद! राष्ट्रवादी काँग्रेसचा लॉकडाऊनला तीव्र विरोध
मुंबई: राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधून लॉकडाऊनला विरोध दर्शवण्यात आला आहे. याआधी भाजपनेही लॉकडाऊनला विरोध केलेला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनच्या निर्णयावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लॉकडाऊनबाबत […]
सचिन वाझेंमुळे सरकार अडचणीत येईल, हे मी तेव्हाच सांगितले होते – संजय राऊत
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले कि, सचिन वाझे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊ शकते, हे मी तेव्हाच सांगितले होते. सचिन वाझे यांना महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा रुजू करण्याबाबतचा निर्णय घेतानाच काही शिवसेना नेत्यांना मी हा इशारा दिला होता, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते […]
सचिन वाझेंचे सर्व मालक चिंतेत की तो NIA ला काय सांगेल : देवेंद्र फडणवीस
नागपूर : सचिन वाझेंचे सर्व मालक याच चिंतेत आहेत की सचिन वाझें NIA ला काय सांगेल, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केला आहे. नवाब मलिक का बरं चिंतेत आहेत? कारण फोन टॅपिंग रिपोर्टमध्ये अनेक लोकांचे बिंग फुटेल. काँग्रेससह हे तिन्ही पक्ष अस्वस्थ आहेत. कारण वाझेंचे हे खरे मालक आहेत. यांनी वाझेंकडून काय काय […]
15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी केला फ्लाईट मध्ये प्रवास? देशमुख यांनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख सर्वांच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात बराच काळ रुग्णालयात होते. त्यानंतर 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी चार्टर्ड फ्लाईट मध्ये प्रवास केल्याची माहिती समोर आली. त्यावर आता अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण […]










