narendra modi with uddhav thackeray
महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छांबद्दल मानले नरेंद्र मोदींचे आभार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांकडून त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून उद्धव ठाकरे यांनीही त्याबद्दल आभार मानले आहेत. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. उद्धव ठाकरे यांच्या दीर्घ […]

महाराष्ट्र राजकारण

फक्त तुमचा उद्योगमंत्री असून चालत नाही, तुमचं सरकारही महत्वाची भूमिका बजावतं-उद्धव ठाकरे

“मागील सरकारमध्ये शिवसेनेचे उद्योगमंत्री असताना करार करूनही  गुंतवणूक आली नाही याचं कारण असं की नुसता तुमचा उद्योगमंत्री असून चालत नाही. तुमचं सरकारही महत्वाची भूमिका बजावतं. धोरणांची अनिश्चितता असेल तर उद्योग येणार नाहीत,” असं उद्धव यांनी सांगितलं. “गुंतवणूक येणार की नाही हे त्या त्या सरकारच्या धोरणावर अवलंबून असतं. नुसती उत्सवप्रियता असेल तर काहीही होणार नाही,” असं […]

महाराष्ट्र राजकारण

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही- भाजपा खासदार उदयनराजे भोसले

शपथविधीदरम्यान ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज दिली. उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना सांगितलं, व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही. काँग्रेसच्या एका खासदाराने आक्षेप घेतला असता त्यांनी फक्त समज दिली. त्यांनी रेकॉर्डवर फक्त शपथ घेतली जाईल आणि हे राज्यघटनेला धरुन नाही इतकंच सांगितलं. शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण केलं जाऊ […]