Sanjay Raut's suggestive statement that Aurangabad will definitely be Sambhajinagar

सचिन वाझेंमुळे सरकार अडचणीत येईल, हे मी तेव्हाच सांगितले होते – संजय राऊत

महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले कि, सचिन वाझे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊ शकते, हे मी तेव्हाच सांगितले होते. सचिन वाझे यांना महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा रुजू करण्याबाबतचा निर्णय घेतानाच काही शिवसेना नेत्यांना मी हा इशारा दिला होता, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राऊत म्हणाले कि, “मी ज्या शिवसेनेच्या नेत्यांना हे सांगितले होते त्यांची नावे उघड करू इच्छित नाही. मात्र, ज्या नेत्यांशी मी वाझेंबाबत बोललो होतो त्यांना त्याची जाणीव आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला धडा मिळाला आहे. एका अर्थाने अशा प्रकारची घटना घडली ते चांगलेच झाले. या प्रकरणामुळे धडा शिकायला मिळाला.” कोणतीही व्यक्ती वाईट नसते. पण कधीकधी परिस्थिती तिला तसे बनवते, असेही ते पुढे म्हणाले.

राऊत म्हणाले कि, सचिन वाझे हे सरकारसाठी अडचणी निर्माण करू शकतात हे मी तेव्हाच सांगितले होते. त्यांचा व्यवहार आणि काम करण्याची पद्धतच तशी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यांचे विधानसभेत समर्थन केले होते. सचिन वाझे हे दहशतवादी नाहीत, असे ते म्हणाले होते. याबाबत उत्तर देताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तेव्हा वाझे यांच्या कामांबाबत माहिती नव्हती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत