पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून पुण्यातील रुग्णालयांमध्ये आता बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी पुणे महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता खासगी रुग्णालयात तब्बल ८० टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत ही महत्वाची माहिती दिली आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटमध्ये म्हणतात कि, ‘खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड्स कोविडसाठी राखीव !… कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खासगी दवाखान्यातील ८० टक्के बेड्स कोविड उपचारासाठी उपलब्ध करुन देण्याबाबतचे आदेश आज काढण्यात आले आहेत. ३१ मार्चपासून हे बेड्स कोविड रुग्णांना उपलब्ध होतील’.
खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड्स कोविडसाठी राखीव !
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खासगी दवाखान्यातील ८० टक्के बेड्स कोविड उपचारासाठी उपलब्ध करुन देण्याबाबतचे आदेश आज काढण्यात आले आहेत. ३१ मार्चपासून हे बेड्स कोविड रुग्णांना उपलब्ध होतील.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 29, 2021
पुणे शहरात एकूण ५ हजार ८ बेड उपलब्ध आहेत. त्यातील फक्त ४९० बेड शिल्लक आहेत. त्यात साध्या खाटांची संख्या २४३ इतकी असून ऑक्सिजन बेडची संथ्या २१७ इतकी आहे. तर, आयसीयू बेड २० आणि व्हेंटिलेटर बेड १० आहेत.