मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केल्याचा पश्चाताप होत नाही. पण असं सरकार स्थापन करायला नको होतं. ती चूकच होती. शंभर टक्के सांगतो. ती चूकच होती. पण त्याचा पश्चाताप होत नाही, अशी कबुलीच देवेंद्र फडणवीस यांनी […]
टॅग: Mahavikas Aghadi
सचिन वाझेंमुळे सरकार अडचणीत येईल, हे मी तेव्हाच सांगितले होते – संजय राऊत
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले कि, सचिन वाझे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊ शकते, हे मी तेव्हाच सांगितले होते. सचिन वाझे यांना महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा रुजू करण्याबाबतचा निर्णय घेतानाच काही शिवसेना नेत्यांना मी हा इशारा दिला होता, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते […]
आता धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा द्यावा – पंकजा मुंडे
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. पूजा चव्हाण प्रकरणात तपास यंत्रणांनी अत्यंत नि:पक्षपातीपणे तपास करणं आणि वेगानं तपास करणं आवश्यक असल्याचं तसंच धर्माच्या पलीकडे जाऊन या गोष्टींचा तपास योग्य मार्गानं व्हावा, असं त्या म्हणाल्या. या प्रकरणात पूजा चव्हाणची ओळख जाहीर केल्याबाबतही […]
विधानसभाध्यक्षपदावर काँग्रेसचाच हक्क! महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?
मुंबई : काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी काल विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. दरम्यान, ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनाम्याबाबत नापसंती दर्शवली. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर […]
हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर.. काँग्रेसने दिला महाविकासआघाडीतील नेत्यांना इशारा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल टिपण्णी केली होती. त्यावरून काँग्रेस आता नाराज असल्याचं बोललं जात होतं, त्यातच आता काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत महाविकास आघाडीतील नेत्यांना इशारा दिला आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरी सातत्यानं चर्चेत येताना दिसत असतात. त्यातच आता काँग्रेसचे नेते राहुल गांधीविषयी करण्यात […]
राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हाताऱ्या बैलासारखे – नितीन गडकरी
राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हाताऱ्या बैलासारखे आहे. या सरकारला तुतारी घेऊन सतत टोचत राहावे लागते. त्याशिवाय ते पुढेच जात नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नागपुरात केली. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ पूर्व विदर्भाच्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. नितीन गडकरी यावेळी म्हणाले, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात […]
अशोक चव्हाण यांचं मोठं वक्तव्य, काँग्रेसच्या महापालिकांना उद्धव ठाकरेंकडून निधी मिळत नाही..
मुंबई : काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असं त्यांनी सांगितलं आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत पोहोचले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक […]
पंकजा मुंडे- धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी
बीड: धनंजय मुंडे यांनी आपण वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत मिळवून दिल्याचा दावा केला आहे तर पंकजा मुंडे यांच्याकडून स्वतः प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला १० कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी मिळाल्यानंतर श्रेयवादावरून मुंडे बहीण-भावात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. आहे. यावरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा […]
कंगना प्रकरणामुळे महाविकास आघाडीत अंतर्गत तणाव
अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती आणण्यात आली आहे. मात्र महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे. सुशांत सिंह प्रकरण हाताळण्यावरुन राज्य सरकारला टीकेला सामोरं जावं लागत आहे त्यातच आता कंगना प्रकरणामुळे महाविकास आघाडीत नाराजी असल्याचं कळत आहे. बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी […]