Pankaja Munde- Dhananjay Munde

आता धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा द्यावा – पंकजा मुंडे

महाराष्ट्र

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. पूजा चव्हाण प्रकरणात तपास यंत्रणांनी अत्यंत नि:पक्षपातीपणे तपास करणं आणि वेगानं तपास करणं आवश्यक असल्याचं तसंच धर्माच्या पलीकडे जाऊन या गोष्टींचा तपास योग्य मार्गानं व्हावा, असं त्या म्हणाल्या. या प्रकरणात पूजा चव्हाणची ओळख जाहीर केल्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वनमंत्री संजय राठोड यांनी पदाचा राजीनामा दिला, पण सदर प्रकरणात राजीनामा देण्यात दिरंगाई झाल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. याबरोबरच धनंजय मुंडे यांच्यावरही काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या काही गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतः योग्य भूमिका घेत आपला राजीनामा द्यावा, असं त्या म्हणाल्या. आपण राज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणवतो आणि या राज्यात पुढच्या पिढीसाठी जी उदाहरणं नेत्यांकडून प्रस्थापित केली जात आहेत ती दुर्दैवी आहेत. फक्त आणि फक्त सरकार, युती टीकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातलं जात आहे, हे दुर्दैवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याप्रमाणे आता रेणू शर्मा आणि करुणा शर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी आमच्या पक्षाची आणि आमची सुरुवातीपासूनच मागणी असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत