पुणे : औंध प्रभाग समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक विजय बाबुराव शेवाळे (वय 61) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे महानगरपालिकेच्या क्रिडा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
शेवाळे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव म्हणून काम केले आहे. मागील महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश करीत निवडणूक लढवली होती. नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या विधी समिती, क्रीडा समिती तसेच प्रभाग समितीवर काम केले आहे. खड्की, औंध परिसरातील सामजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी बोपोडी स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.