home minister anil deshmukh clarification on Travel in flight on 15 February

15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी केला फ्लाईट मध्ये प्रवास? देशमुख यांनी दिलं स्पष्टीकरण

महाराष्ट्र राजकारण

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख सर्वांच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात बराच काळ रुग्णालयात होते. त्यानंतर 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी चार्टर्ड फ्लाईट मध्ये प्रवास केल्याची माहिती समोर आली. त्यावर आता अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अनिल देशमुख यांनी म्हटलं कि, “गेल्या काही दिवसांपासून काही लोकांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियातून चुकीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मी फार व्यथित झालो आहे. कोरोनाच्या एक वर्षाच्या काळात आमच्या पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो. नागपूरला पाच फेब्रुवारीला मी कोरोनाबाधित झालो. त्यानंतर 5 ते 15 फेब्रुवारी मी नागपूरच्या एलिक्झर रुग्णालयात दाखल होतो. 15 फेब्रुवारीला जेव्हा मला डिस्चार्ज मिळाला, तेव्हा होम क्वारंटाईनसाठी मी खासगी विमानाने नागपूरहून लगेच मुंबईला आलो.”

देशमुख पुढे म्हणाले कि, “होम क्वारंटाईन झाल्यानंतर मी लॉकडाऊनच्या सूचनेप्रमाणे रात्री उशिरा पार्कमध्ये प्राणायाम करण्यासाठी जात होतो. नागपूरमध्ये हॉस्पिटलला जाण्याच्या वेळेदरम्यान आणि मुंबईतील होम क्वारंटाईनच्या दरम्यान मी अनेकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका किंवा कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो. होम क्वारंटाईननंतर एक मार्चपासून आमचं अधिवेशन होतं. त्याच्या कामाला मी लागलो. त्या दरम्यान अधिवेशनासाठी आमची जी प्रश्नोत्तरं होती, लक्षवेधी सूचना होत्या, त्याच्या मीटिंगसाठी माझ्या शासकीय निवासस्थानी अनेक अधिकारी येत होते. त्यानंतर शासकीय कामासाठी पहिल्यांदा 28 फेब्रुवारीला घराच्या बाहेर पडलो.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत