Anil Deshmukh had traveled by plane on February 15

15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी केला होता विमानाने प्रवास

महाराष्ट्र राजकारण

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख सर्वांच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात बराच काळ रुग्णालयात होते. आता अशी काही कागदपत्रे पुढे आली आहेत, ज्यावरून असे दिसून येत आहे की या काळात अनिल देशमुख यांनी चार्टर्ड फ्लाईट मध्ये प्रवास केला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

15 फेब्रुवारी 2021 रोजीचे चार्टर्ड एअरक्राफ्टचे एक कागदपत्र समोर आले आहे, ज्यात प्रवाशांच्या यादीत अनिल देशमुख यांचेही नाव आहे. 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी नागपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी चार्टर्ड विमानाने प्रवास केला होता.

परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची सतत मागणी होत आहे. दरम्यान, सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी अनिल देशमुख यांचा बचाव केला. पवार यांनी दावा केला की अनिल देशमुख 5 ते 15 फेब्रुवारी दरम्यान रूग्णालयात उपचार घेत होते आणि त्यानंतर त्यांनी स्वत: ला घरी विलगीकरणात ठेवले होते.

मात्र, शरद पवारांच्या दाव्यानंतर लगेचच भाजपने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. 15 फेब्रुवारी रोजी झालेल्या अनिल देशमुख यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ भाजपाने ट्विट केला. शरद पवार अनिल देशमुख रूग्णालयात होते, असा दावा करत आहेत, पण ते पत्रकार परिषद घेत होते, असं भाजपने म्हटलं होतं.

या वादानंतर, अनिल देशमुख यांनीही एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. ते आपल्या स्पष्टीकरणात म्हणाले की, 15 फेब्रुवारीपर्यंत ते रुग्णालयात होते, जेव्हा तिथून बाहेर आले तेव्हा काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. पण आजारी असल्यामुळे ते खुर्चीवर बसले आणि पत्रकारांशी बोलले, त्यानंतर ते घरी गेले आणि त्यांनी स्वत: ला घरी विलगीकरणात ठेवले.

काय आहे प्रकरण ?

परमबीर सिंग यांनी एका पत्रात दावा केला होता की अनिल देशमुख यांनी सचिन वाजे यांना मुंबईतून दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य ठेवले होते. यानंतर राजकीय गदारोळ सुरू आहे. भाजप अनिल देशमुख यांचा राजीनामा मागत आहे. तथापि, अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत