Mamata Banerjee was not attacked, Election Commission decision

ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालाच नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय

देश राजकारण

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला झालेल्या दुखापतीबद्दलच्या अहवालानंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबतीत अनेक वेगवेगळ्या अहवालांच्या आधारे निवडणूक आयोग या निष्कर्षापर्यंत पोहोचला आहे की ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालेला नाही, त्याबाबत कोणताही पुरावा मिळालेला नाही. म्हणजेच नंदीग्राममध्ये ममता यांच्या पायाला झालेली जखम हा एक अपघात होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ममता बॅनर्जी जखमी झाल्यानंतर निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय, विशेष पोलिस पर्यवेक्षक विवेक दुबे आणि विशेष पर्यवेक्षक अजय नायक यांनी तयार केलेल्या अहवालावरून हा निर्णय घेण्यात आहे. शनिवारी सायंकाळी या घटनेचा सविस्तर अहवाल आयोगाला सादर करण्यात आला. काही तासांपूर्वी विशेष पोलिस पर्यवेक्षक आणि विशेष पर्यवेक्षक यांचे अहवालही आयोगाला मिळाले. त्यानंतर आज दुपारी बैठक बोलावून या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर निवडणूक आयोगाने सांगितले की ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचा पुरावा मिळालेला नाही.

बंगालचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांनी आपला नवीन चौकशी अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला होता कारण त्यांच्या पहिल्या अहवालात घटनेमागील खरे कारण काय होते हे समजू शकले नाही. ही घटना कोठे व कशी घडली हे या पहिल्या अहवालावरून कळू शकले नाही. मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात गर्दीचा दबाव, अरुंद रस्ता, रस्त्याच्या कडेला असलेला लोखंडी खांब, दरवाजा धक्का लागून बंद झाला, ममता यांचा बाहेर असलेला पाय जखमी झाला, यासारख्या वस्तुस्थितीनुसार गोष्टी नमूद केल्या होत्या, परंतु, हा अहवाल एका निर्णयापर्यंत पोहोचला नव्हता.

त्यानंतर मात्र वेगवेगळ्या अहवालांवर विचारमंथन केल्यानंतर निवडणूक आयोगाने असा निष्कर्ष काढला आहे की ममता बॅनर्जी यांना झालेली जखम ही हल्ल्यामुळे झाली नव्हती. तर तो एक अपघात होता. मात्र, ममता बॅनर्जी यांनी षडयंत्रांतर्गत त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत