Jayant Patil

जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

कोरोना महाराष्ट्र राजकारण

सांगली : राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा तात्पुरती स्थगित केली जाण्याची शक्यता आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटलं कि, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली करोना चाचणी करून घ्यावी,’ अशी विनंती त्यांनी केली आहे. ‘जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल, सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे.’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेच्या निमित्तानं जयंत पाटील हे अनेक दिवसांपासून राज्यभर फिरत आहेत. आतापर्यंत त्यांनी विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे दौरे केले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे असा त्यांचा कार्यक्रम होता. या दौऱ्यात त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत