OBC creamy layer
देश राजकारण

बेशिस्त वर्तन केल्यामुळे ‘हे’ १२ खासदार राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ‘बेशिस्त वर्तन’ केल्यामुळे विरोधी पक्षाच्या बारा खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. एकूण १२ खासदारांना त्यांच्या अनियंत्रित वर्तनासाठी राज्यसभेच्या संपूर्ण अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे की, “हे सभागृह गंभीरपणे दखल घेते आणि अध्यक्षांच्या अधिकाराची पूर्ण अवहेलना करणे, सभागृहाच्या नियमांचा सतत गैरवापर करणे, अभूतपूर्व गैरवर्तन आणि अवमानकारक कृतींद्वारे सभागृहाच्या कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा आणणे, बेशिस्त आणि हिंसक वर्तन आणि राज्यसभेच्या 254 व्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 11 ऑगस्ट रोजी सुरक्षा कर्मचार्‍यांवर केलेले हेतुपुरस्सर हल्ले याचा तीव्र निषेध करते.

या खासदारांना निलंबित करण्यात आले :

  1. एलामाराम करीम (CPM)
  2. फुलो देवी नेताम (कॉँग्रेस)
  3. छाया वर्मा (कॉँग्रेस)
  4. रिपुन बोरा (कॉँग्रेस)
  5. बिनॉय विश्वम (CPI)
  6. राजमणी पटेल (कॉँग्रेस)
  7. डोला सेन (TMC)
  8. शांता छेत्री (TMC)
  9. सय्यद नासिर हुसेन (कॉँग्रेस)
  10. प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना)
  11. अनिल देसाई (शिवसेना)
  12. अखिलेश प्रसाद सिंग (कॉँग्रेस)
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत