mohammad azharuddin accident in sawai madhopur
देश

माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला भीषण अपघात, अझरुद्दीन थोडक्यात बचावले

जयपूर : माजी क्रिकेटपटू आणि कॉंग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन यांचा राजस्थानातील सवाई माधोपूर येथे अपघात झाला. या अपघातात मोहम्मद अझरुद्दीन यांची गाडी पलटली. लालसोट कोटा मेगा हायवेवरील सुरवाल पोलिस ठाण्याजवळ हा अपघात झाला. मोहम्मद अझरुद्दीन या अपघातातून थोडक्यात बचावले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांच्या धावत्या कारचा टायर निखळल्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यात घुसली. या अपघातात अझरुद्दीन व त्याच्या कुटूंबाला कोणतीही इजा झाली नाही, परंतु ढाब्यावर काम करणारी चाळीस वर्षाची एक व्यक्ती जखमी झाली आहे. त्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या भीषण अपघातानंतर तिथे गर्दी जमली. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला दुसर्‍या गाडीतून हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अझरुद्दीन आपल्या परिवारासोबत रणथंभोरला येत होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत