मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. जयंत पाटील यांना उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होता. ईडीकडून या प्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी […]
टॅग: jayant patil
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही – जयंत पाटील
मुंबई : सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे.’ असं ते म्हणाले. जयंत पाटील यांनी ट्वीट केलं कि, […]
बीड जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय
बीड : बीड जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येतील यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्याच्या क्षमतेत मोठी वाढ होऊ शकेल . जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात यामुळे वाढ होईल असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांनी केले. जलसंपदामंत्री पाटील म्हणाले जल सिंचन प्रकल्पांमध्ये गाळ साठल्याने त्याच्या पाणी साठ्यावर परिणाम होतो आहे. पाणी साठवण […]
ई-पीक पाहणी ॲपवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी करावी – पालकमंत्री जयंत पाटील
सांगली : ई पीक पाहणी उपक्रमामुळे वस्तुनिष्ठ व अचूक माहिती मिळाल्याने धोरणात्मक बाबींमध्येही अचुकता येईल. त्यामुळे या उपक्रमात सुशिक्षित शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी पेठ येथील शेतकरी शिवाजी बापू माळी यांच्या शेतावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी संपत खिलारी, तहसिलदार […]
मराठवाड्यातील पाणीटंचाई असणाऱ्या भागांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा- जयंत पाटील
मुंबई : मराठवाड्यातील पाण्याची तीव्र अडचण भासत असणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा व भागांचा अभ्यास करावा तसेच या भागांना पाणी देण्यासाठीचे पर्याय शोधावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिले. सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमवेत मंत्रालय येथे बैठक झाली. या बैठकीत भराडी बृहत लघु पाटबंधारेसंदर्भात सर्वेक्षण […]
महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या चर्चेला उधाण, ‘त्या’ मुद्द्यावर संजय राऊत म्हणाले…
मुंबई : जलसंपदा विभागाच्या कामांची फाइल वित्त विभागाकडे पाठवण्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना धारेवर धरले. असेच काम चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करा, असे उद्गारही त्यांनी काढले. दरम्यान यानंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, आज याबाबत शिवेसना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते […]
जयंत पाटील यांना कोरोनाची लागण
सांगली : राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा तात्पुरती स्थगित केली जाण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटलं कि, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच […]
राजकारणात अनेक जयंत पाटील, राणे नेमकं कोणत्या पाटलांबद्दल बोलले – सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलेल्या दाव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. राणे नेमकं कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले मला कल्पना नाही,’ अशा शब्दांत सुळे यांनी राणेंच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आज महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते. जयंत पाटील […]
नारायण राणेंचा मोठा दावा : जयंत पाटलांची भाजपमध्ये जाण्यासाठी सगळी बोलणी झाली होती; गद्दारी करून सरकार स्थापन
रत्नागिरी : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला झालेल्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या अपयशाबाबत बोलण्याकरता आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणेंनी केलेल्या गौप्यस्फोटावरून आता काही प्रमाणात का असेना पण उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे. रत्नागिरी येथे बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं […]
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर एकनाथ खडसेंना संधी, खडसेंची प्रतिक्रिया
जळगाव : राष्ट्रवादीकडून राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव जवळपास निश्चित केलं आहे. सहकार आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने राष्ट्रवादीने त्यांची निवड केली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून माझ्या नावाची शिफारस झाल्याचा मला आनंद आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसंच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मी आभार मानतो, असं खडसे […]







