निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस (TMC) च्या तक्रारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लस घेतानाच फोटो आणि व्हिडिओ येत्या ७२ तासांत निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून हटवण्याचे आदेश दिले आहेत. टीएमसीने निवडणूक आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत हे भाजपचे सेल्फ प्रमोशन असल्याचे म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल पंपांसह अनेक सार्वजनिक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लस घेतानाचा फोटोंचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. टीएमसीने या होर्डिंग्जविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर आयोगाने आता पुढील 72 तासांत असे पोस्टर्स काढण्याचे आदेश जारी केले आहेत.
Elections declared. PM photo still brazenly appearing on #COVID19 documents. Trinamool @AITCofficial taking this up strongly with Election Commission @ECISVEEP https://t.co/Mh3zwP59Wj
— Derek O’Brien | ডেরেক ও’ব্রায়েন (@derekobrienmp) March 2, 2021
तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या लसीकरणाच्या प्रमाणपत्रात पंतप्रधान मोदींच्या छायाचित्र व्यतिरिक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेत त्यांच्या वतीने संदेशही छापण्यात आलेला आहे.
डेरेक ओ ब्रायन यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की पंतप्रधान मोदी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या लसीकरणाच्या प्रमाणपत्राद्वारे आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत तसेच कोविड लस तयार करणाऱ्यांचे श्रेयदेखील चोरत आहेत.