मुंबई : कोरोनावर नियंत्रण मिळालंय असं दिसत असतानाच पुन्हा एकदा राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे 9,855 रुग्ण आढळून आले. ही संख्या गेल्या चार महिन्यामधील सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.
राज्यात आज 9855 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6559 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2043349 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 82343 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.77% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 3, 2021
राज्यात कोरोनाचे एकूण 21 लाख 79 हजार 185 रुग्ण आहेत. तर बुधवारी राज्यात कोरोनामुळे 42 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं पहायला मिळालंय. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या आता 52,280 इतकी झाली.राज्यात आता कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 20 लाख 43 हजार 349 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 82,343 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. बुधवारी मुंबईमध्ये कोरोनाचे 1,121 रुग्ण समोर आले आहेत तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या आता 3,28,742 इतकी झाली आहे.




