महाराष्ट्रात भाजप सत्तांतरासाठी ‘ईडी’चा वापर करून काही सत्ताधारी नेत्यांवर दबाव आणू पाहत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटमधून भाजपावर नाव न घेता निशाणा साधण्यात आला आहे. या ट्विट केलेल्या व्यंगचित्राला भरपूर लाईक्स मिळाल्याचे दिसत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे पुण्यात निधन
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत […]
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन वाढवला, या तारखे पर्यंत असे असतील नियम…
मुंबई : कोरोनाच्या फैलावामुळे महाराष्ट्रात 31 डिसेंबर 2020 पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. याबाबतचा आदेश आज राज्यातील ‘ ठाकरे सरकार ‘कडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे. दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचं समोर आलं. खरंतर, मिशन बिगेनच्या अंतर्गत लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर […]
प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी
पुणे: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची आठ तास ईडीने चौकशी केली आहे. ईडीने अचानक केलेल्या या चौकशीमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या. आज सकाळी अविनाश भोसले यांना मुंबईत बोलावून घेतले. आज सकाळी […]
चंद्रकांत पाटील हे बावचळल्यासारखे बोलत असतात – अजित पवार
सध्या भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. भाजपचे नेते कोणाहीबद्दल काहीही बोलतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तर बावचळल्यासारखे बोलत असल्याची टिप्पणी अजित पवार यांनी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रचारसभेत भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला. भाजपमधील कार्यकर्ते कुठे जाऊ […]
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का – देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. एकाच दिवशी आलेले निकाल सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत, असं ते म्हणाले आहेत. न्यायालयालाही महाराष्ट्रद्रोही ठरवणार का? अशी विचारणा देखील त्यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन महापालिकेला फटकारलं असून दुसरीकडे […]
कंगना विरोधात BMC कडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने, उच्च न्यायालयाने दिला निर्णय
अभिनेत्री कंगना रनौतच्या वांद्र्यातील कार्यालयाच्या पाडकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला (BMC) मोठा झटका दिला आहे. कंगनाच्या इमारतीचे केलेले पाडकाम बेकायदेशीर ठरवत हायकोर्टाने बीएमसीने पाठवलेली नोटीसही अवैध ठरवली आहे. अभिनेत्री कंगना रणौत विरोधात महापालिकेकडून सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. महापालिकेकडून कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली […]
ठाणे शहरात कुत्र्याला मारहाण करुन जिवंत जाळले
ठाणे शहरात एका कुत्र्याला मारहाण करुन जिवंत पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील वाघबीळ परिसरात असलेल्या किंगकॉंग नगर येथे ही घटना घडली आहे. ललित मलिक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी विक्की उर्फ धीरज संतोष रेड्डी (वय 26) याला अटक केली असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर […]
ब्रेकिंग : दौंड रेल्वे स्टेशनवरील उपहारगृहात लागली आग, क्षणार्धात भडका झाला…
दौंड : दौंड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरील फुडीज प्लाझा या उपहारगृहात सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास मोठी आग लागली, क्षणार्धात त्याचा भडका झाला परंतु सुदैवाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीची झळ रेल्वे स्थानकाच्या पत्र्याला बसली आणि पत्र्यावर ठेवलेल्या पुठ्ठ्याच्या रिकाम्या खोक्यांना आग लागल्याने आग पसरली. उपहारगृह चालकाकडे आग विझविण्यासाठीचे उपकरण […]
पंकजा मुंडेंचा सरकारवर हल्लाबोल, अनेक वर्षे सत्ता, तरीही मराठा आरक्षण देता आलं नाही
औरंगाबाद : पंकजा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. त्या म्हणाल्या कि राज्यात अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही. त्या पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या भाजप उमेदवार शिरीष बोराळकरच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होत्या. औरंगाबादमध्ये विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर, भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना उमेदवारी […]










