a dog was beaten and burnt In Thane

ठाणे शहरात कुत्र्याला मारहाण करुन जिवंत जाळले

ठाणे

ठाणे शहरात एका कुत्र्याला मारहाण करुन जिवंत पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील वाघबीळ परिसरात असलेल्या किंगकॉंग नगर येथे ही घटना घडली आहे. ललित मलिक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी विक्की उर्फ धीरज संतोष रेड्डी (वय 26) याला अटक केली असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, ललित मलिक घरी जात असताना त्यांचा हात चुकून तेथे पार्क केलेल्या मोटरसायकलवरील झेंड्याला लागला. विक्कीने हे पाहिले आणि त्याने रागाच्या भरात ललित मलिक यांना मारहाण केली. यानंतर आरोपी विक्की पुन्हा मलिकच्या घरी आला. मलिक यांच्या घराबाहेरील कुत्रा त्याला पाहून भुंकू लागला. रागाने विक्की याने कुत्र्याला मारहाण करत जाळले. गोंधळ ऐकूण शेजारील नागरिक घराबाहेर आले असता विक्कीने चाकूचा धाक दाखवत मारण्याची धमकी दिली. विक्की हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत