DCM Ajit Pawar slams Chandrakant Patil
महाराष्ट्र राजकारण

चंद्रकांत पाटील हे बावचळल्यासारखे बोलत असतात – अजित पवार

सध्या भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. भाजपचे नेते कोणाहीबद्दल काहीही बोलतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तर बावचळल्यासारखे बोलत असल्याची टिप्पणी अजित पवार यांनी केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रचारसभेत भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला. भाजपमधील कार्यकर्ते कुठे जाऊ नयेत, यासाठी महाविकास आघाडी सरकार पडेल असे गाजर दाखवण्याचे काम सुरु आहे. तरीदेखील एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्यासारखे नेते आमच्याकडे आले, असंदेखील अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत