uddhav-thakrey
महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन वाढवला, या तारखे पर्यंत असे असतील नियम…

मुंबई : कोरोनाच्या फैलावामुळे महाराष्ट्रात 31 डिसेंबर 2020 पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. याबाबतचा आदेश आज राज्यातील ‘ ठाकरे सरकार ‘कडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचं समोर आलं. खरंतर, मिशन बिगेनच्या अंतर्गत लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर वाढला. यामुळे संसर्गाने पुन्हा फैलाव सुरू केला आहे. यामुळे 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यासाठी कठोर नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत यात कोणताही बदल होणार नसून तेव्हाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे २०२० या वर्षात लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याची आशा आता मावळली आहे.

खरंतर, देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असणार अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी देण्यात आली होती. केंद्राकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी द्यावी. तसेच कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे:

  1. सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
  2. सामाजिक अंतर राखणं गरजेचं
  3. सतत हात धुणे आवश्यक
  4. चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी
  5. जलतरण तलावात एकावेळी एकाच खेळाडूला परवानगी
  6. धार्मिक कार्यक्रम, खेळ यासाठी मोकळ्या मैदानात 200 जणांना परवानगी
  7. बंद मोठ्या सभागृहात 100 जणांना परवानगी
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत