Pankaja Munde

पंकजा मुंडेंचा सरकारवर हल्लाबोल, अनेक वर्षे सत्ता, तरीही मराठा आरक्षण देता आलं नाही

औरंगाबाद महाराष्ट्र राजकारण

औरंगाबाद : पंकजा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. त्या म्हणाल्या कि राज्यात अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही. त्या पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या भाजप उमेदवार शिरीष बोराळकरच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होत्या.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

औरंगाबादमध्ये विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर, भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या पक्षातील दिग्गज नेते औरंगाबाद मतदारसंघाचा दौरा करत आहेत. यावेळी प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आत आहेत.

पंकजा मुंडे यांनी सतीश चव्हाण तसेच सरकारवर टीका केली आहे म्हणाल्या कि, आमदार सतीश चव्हाण यांनी कधीच पदवीधरांचा प्रश्न मांडला नाही. ते कुठेही मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरले नाहीत. अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही. तसेच, पुढे मराठा आरक्षणावर बोलताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. असेही त्या म्हणाल्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत