Terrible accident on Beed-Aurangabad highway
महाराष्ट्र

बीड-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, वंचितच्या चार पदाधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू

बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई जवळ कार आणि ऑईल टँकरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबादकडे जात असताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या चार पदाधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. लातूरचे वंचितचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचा मृतात समावेश आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहिती नुसार, लातूरचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे हे आपल्या कार्यकरत्यासह औरंगाबादला कामानिमित्त कार (क्रं.एम.एच.46 बी.9700) मधून जात होते. गेवराई शहरातील झमझम पेट्रोल पंपाच्या पाठिमागे असलेल्या बायपास रोडवर कार येताच, कारचालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्ता ओलांडून समोरून येत असलेल्या इंडीयन ऑईलच्या कंन्टेनर (क्रं.जी.जे.16, ए.यू.2475) ला धडकली. मृतांमध्ये सदाशिव भिंगे, संतोष भिंगे, महादेव सकटे, सुभाष भिंगे यांचा समावेश असून राम भिंगे हे गंभीर जखमी असल्याचे समजते.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दु:ख व्यक्त करत मयतांना श्रध्दांजली वाहिली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत