India-china
ग्लोबल देश

मॉस्को येथे भारत आणि चीन शिष्टमंडळांची २ तास २० मिनिटे चर्चा

रशियाची राजधानी मॉस्को येथे शांघाय को-ऑपरेशनच्या बैठकीच्या निमित्ताने भारत आणि चीनच्या शिष्टमंडळांची एक बैठक झाली. दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी आपापल्या शिष्टमंडळांचे नेतृत्व केले. ही बैठक २ तास २० मिनिटे सुरू होती. बैठकीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव दूर करण्यावर चर्चा झाली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव चर्चेच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न […]

taivan defence ministry
ग्लोबल

तैवानने चीनचं सुखोई विमान पाडलं? तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केलं स्पष्ट…

तैवानने चीनचे सुखोई-३५ फायटर जेट पाडल्याचा दावा करणारे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘तैवानने चीनचं सुखोई विमान पाडलं?’ अशा मथळ्याच्या अनेक बातम्या सध्या इंटरनेटवर व्हायरल झाल्या आहेत, मात्र आम्ही हे वृत्त फेटाळून लावत आहोत. ही माहिती खोटी असून यात थोडीही सत्यता नाही, असं तैनावने स्पष्ट केलं आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने […]

china-sukhoi aircraft
ग्लोबल

तैवानच्या वायुदलानं चीनचं सुखोई-35 विमान पाडल्याचा संशय

तैवानच्या वायुदलानं चीनचं सुखोई-35 विमान पाडल्याचा संशय सध्या व्यक्त करण्यात येत आहे. तैवानच्या हवाई हद्दीत चीनचं विमान घुसल्यानं विमान पाडण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. तसेच चीनचं विमान पाडण्यासाठी तैवानने अमेरिकी पेट्रियाट मिसाइल डिफेंस सिस्टमचा वापर केला आहे. अद्याप घडलेल्या प्रकाराबाबत दोनही देशांकडून कोणत्याच प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या चीनचे शेजारील देशांसोबत तणावपूर्ण […]

china high tech weapons
ग्लोबल

जागतिक महासत्ता बनण्यासाठी चीनकडून उचलली जात आहेत पावले..?

भारत आणि अमेरिकेसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने आपली नवीन हायटेक शस्त्रे जगासमोर आणली आहेत. या हायटेक शस्त्रांमध्ये आर्यन मॅनसारख्या एका खास सूटने जगाचे लक्ष वेधले आहे. या सूटमुळे चिनी सैन्याला मोठा फायदा होणार आहे. भारतीय जवानांनी पॅन्गाँग त्सो सरोवराजवळ चिनी सैन्याच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला. यामुळे चीनचा घुसखोरीचा डाव जगासमोर आला. त्यातच अमेरिका आणि चीनमध्ये […]

UNSC
ग्लोबल

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला मोठा झटका

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) दोन भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने मांडला होता. मात्र अमेरिका, यूके, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियम या परिषदेच्या पाच सदस्यांनी सबळ पुराव्याअभावी पाकिस्तानचा प्रस्ताव मंजूर होऊ दिला नाही. अंगारा अप्पाजी आणि गोबिंदा पटनायक या दोन भारतीयांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दहशतवादी घोषित करावे, यासाठी पाकिस्तानने प्रस्ताव मांडला होता. संयुक्त […]

worlds fastest runner usain bolt
क्रीडा ग्लोबल

जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टची करोना चाचणी पॉझिटिव्ह

जगातील सर्वात वेगाने धावणारा धावपटू उसेन बोल्ट याची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बोल्टला करोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. तरी त्याने स्वत:ला आयसोलेट केले आहे. गेल्या आठवड्यात बोल्टने त्याचा ३४वा वाढदिवस जल्लोषात साजरा केला होता. या वाढदिवसाच्या पार्टीत त्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. पार्टीत मास्कचा वापर केला गेला नव्हता. शनिवारी त्याचा वाढदिवस झाल्यानंतर त्याची […]

mahatma gandhi spectacles biggest auction of the century
ग्लोबल

शतकातील सर्वात मोठा लिलाव, गांधीजींचा चष्मा विकला गेला इतक्या कोटींना…

ब्रिटनच्या एका लिलाव संस्थेने महात्मा गांधींच्या चष्म्याचा  २,६०,००० पौडांना (जवळपास २.५५ कोटी रुपये) लिलाव केला. हा चष्मा महात्मा गांधींनी वापरला असून नंतर तो कुणालातरी भेट म्हणून दिल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेच्या एका व्यक्तीने बोली लावून हा चष्मा विकत घेतला. हा चष्मा १०,००० ते १५,००० पौडांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, पण ऑनलाईन लिलावात बोली वाढत […]

Tedros Adhanom Ghebreyesus WHO corona vaccine
कोरोना ग्लोबल

कोरोना केव्हा संपेल? WHO चे महासंचालक टेड्रोस गेबेरियसस यांनी सांगितलं…

जगात सर्वत्र कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. अशा परिस्थितीत सर्वजण वाट बघत आहेत ती कोरोना लसीची. भारतातही करोनावर लस शोधण्यात आली असून, तिच्या चाचण्या सुरू  करण्यात आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेबेरियसस यांनी सांगितलं की, “करोनाविरोधात लस हे एक महत्त्वपूर्ण साधन असेल. आम्हाला अपेक्षा आहे की, दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत सर्व देश कोरोना […]

vande bharat train contract cancel
ग्लोबल देश

केंद्र सरकारकडून ४४ ट्रेनचं कंत्राट रद्द, चीनला मोठा झटका

केंद्र सरकारकडून सेमी हाय स्पीड ‘वंदे भारत’ ट्रेनचं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. रेल्वे मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. यामुळे केंद्र सरकारने चिनी कंपनीला जोरदार झटका दिला आहे. एकूण ४४ सेमी हाय स्पीड ट्रेनचा पुरवठा करण्यासाठी असणाऱ्या स्पर्धकांमध्ये चिनी कंपनी भागीदार होती, यामुळे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय चीनसाठी मोठा झटका आहे. चीनमधील CRRC Yongji Electric […]

ग्लोबल

अमेरिका आणि कॅनडामध्ये कांद्यांत सापडले जिवाणू, जवळपास ५०० जण हॉस्पिटलमध्ये

अमेरिका आणि कॅनडा येथे थॉमसन इंटरनॅशनल कंपनीने पुरवलेल्या कांद्याचे सेवन केलेल्या नागरिकांना पोटदुखी आणि जुलाबांचा त्रास सतावत आहे. आतापर्यंत जवळपास ५०० जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ आली आहे. दरम्यान, थॉमसन इंटरनॅशनल कंपनीच्या कांद्यात साल्मोनेला जिवाणू आढळला आहे. हा जिवाणू माणसाच्या पचनसंस्थेवर परिणाम करतो. सतत जुलाब होत असल्यामुळे अशक्तपणा जाणवत असल्याच्या तसेच ताप आल्याच्या तक्रारी काही […]