भाजपनेते टी. राजा सिंह यांनी फेसबुकवर आणि जाहीरपणेही रोहिंग्या मुस्लीमांना गोळ्या घातल्या पाहिजेत असे म्हटले होते. मुस्लीम देशद्रोही आहेत, मशिदी उद्ध्वस्त केल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले होते. भारतामध्ये फेसबुकनं या पेजेसवर कारवाई करण्यास नकार दिल्याचं वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलनं प्रसिद्ध केलं होतं. या वृत्तावरून फेसबुकच्या भूमिकेबद्दल नवा वाद निर्माण झाला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलनं वृत्तात […]
ग्लोबल
Stay updated with the latest global news, including important updates and events from around the world. This category brings you breaking news, in-depth reports, and analysis on international affairs, politics, economy, environment, and more. We cover major happenings from across the globe, focusing on how they impact India, Maharashtra, and the world at large. Whether it’s geopolitical developments, global health news, or international trends, our Global News section ensures you stay informed on what’s happening globally.
मोठी बातमी: जगातील पहिल्या कोरोना लसीची रशियाने केली नोंद
कोरोना व्हायरसवरील पहिली लस तयार झाली असून ती आज लाँच करण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज असा दावा केला आहे. ते पुढे असंही म्हणाले की, मला माहित आहे की, ही लस प्रभावी आणि रोग प्रतिकारशक्ती निर्माण करणारी आहे. ही लस रशिया सरकारच्या गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने तयार केली आहे. ही जगातील पहिली लस […]
करोना चाचण्यांच्या बाबतीत अमेरिका पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर- डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना चाचण्यांच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक असून दुसरा कोणताही देश जवळपासही फिरकत नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. आम्ही जवळपास साडे सहा कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या असून इतर कोणताही देश आमच्या जवळपासही नाही. एक कोटी १० लाख चाचण्यांसोबत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. […]
बैरुत स्फोटांमुळे लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांचा संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा
लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांनी बैरुत स्फोटांमुळे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा दिला, त्यामुळे आठवडाभरात सरकार पायउतार झालं आहे. पंतप्रधान हसन दियाब यांनी सोमवारी (१० ऑगस्ट) संध्याकाळी देशाला संबोधताना सरकार पायउतार होत असल्याची घोषणा केली. बैरूतमध्ये झालेल्या स्फोटाच्या निषेधार्थ लेबनॉनमध्ये सरकारविरोधात मोठया प्रमाणावर निदर्शने, आंदोलने सुरु झाली. तिथल्या सरकारविरोधात जनक्षोभ वाढला. पंतप्रधान हसन दियाब यांच्या राजीनाम्याआधी […]
डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरु असताना व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील करोना संकटाची माहिती देण्यासाठी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. पत्रकार परिषदेला संबोधित करत असतानाच व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार झाला. बाहेर गोळीबार होताच तिथे उपस्थित असलेल्या सिक्रेट सर्व्हीसच्या एजंटसनी ट्रम्प यांना या घटनेची माहिती दिली व त्यांना काही वेळासाठी व्हाइट हाऊसच्या पत्रकार कक्षातून बाहेर नेलं. सुरक्षा रक्षकांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानंतर ट्रम्प […]
‘या’ ३२७ वस्तूंची आता चीनमधून आयात करण्याची गरज नाही
भारत-चीन व्यापारामध्ये मोठया प्रमाणावर असमतोल आहे. आपण चीनकडून आयात करतो त्या तुलनेत चीनला निर्यात करत नाही. व्यापारामध्ये अनेक वस्तुंसाठी आपण चीनवर अवलंबून आहोत. हे कमी करण्यासाठी आरआयएस (संशोधन व माहिती प्रणाली) ने अभ्यास करुन काही चांगले पर्याय सुचवले आहेत. चीनकडून भारत आयात करत असलेल्या वस्तूंमधील ३२७ वस्तू यांची पर्यायी आयात शक्य आहे, तसेच भारतातही याचे […]
न्यूझीलंडमध्ये गेल्या १०० दिवसांपासून एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नाही
जगात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत चालला आहे. भारत आणि न्यूझीलंड या देशात जवळपास एकाचवेळी लॉकडाउन घेण्यात आला होता. भारतामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे पण अनलॉक होताना देशातील करोनाचा संसर्ग वेगानं होत असल्याचं समोर आलं आहे. याउलट न्यूझीलंड सारख्या छोट्या देशानं करोनावर यशस्वी मात केली आहे. trtworld च्या वृत्तानुसार, भारतासोबतच लॉकडाउन करणाऱ्या न्यूझीलंडमध्ये गेल्या १०० […]
१२ ऑगस्टला रशिया पहिल्या कोरोना लसीची नोंदणी करणार
जगभरातील अनेक वैज्ञानिक कोरोना व्हायरसवर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच जगाला कोरोनाची पहिली लस मिळण्याची शक्यता आहे. रशियाचे उप-आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी सांगितले की, रशिया 12 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं पहिलं वॅक्सिन रजिस्टर करणार आहे. हे वॅक्सिन मॉस्को येथील गमलेया इंस्टीट्यूट आणि रशियातील संरक्षण मंत्रालयाने एकत्र येऊन तयार केलं […]
अमेरिकाही चिनी अॅपवर बंदी घालणार; ट्रम्प यांची आदेशावर स्वाक्षरी
काही दिवसांपूर्वी चीनचं दूतावास बंद करण्याचे आदेश देणाऱ्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला आणखी एक दणका दिला. भारतापाठोपाठ अमेरिकेनंही चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी संध्याकाळी चिनी अॅप टिकटॉक आणि वी-चॅटवर ४५ दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. ट्रम्प यांनी हा आदेश काढल्यानंतर चीननं यावर संताप व्यक्त केला […]
भारतात कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला २० लाखांचा टप्पा
भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. भारतात आता कोरोनाग्रस्तांची संख्या २० लाख 21 हजार 407 इतकी झाली आहे. भारत आता ब्राझिलच्या मागोमाग आहे. जगात ज्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत त्यात भारताचा क्रमांक तिसरा आहे. अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त, ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त तर भारतात २० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. […]










