ग्लोबल

न्यूझीलंडमध्ये गेल्या १०० दिवसांपासून एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नाही

जगात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत चालला आहे. भारत आणि न्यूझीलंड या देशात जवळपास एकाचवेळी लॉकडाउन घेण्यात आला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारतामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे पण अनलॉक होताना देशातील करोनाचा संसर्ग वेगानं होत असल्याचं समोर आलं आहे. याउलट न्यूझीलंड सारख्या छोट्या देशानं करोनावर यशस्वी मात केली आहे. trtworld च्या वृत्तानुसार, भारतासोबतच लॉकडाउन करणाऱ्या न्यूझीलंडमध्ये गेल्या १०० दिवसांपासून एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नाही. ५० लाख लोकसंख्या असणाऱ्या न्यूझीलंडने करोनावर यशस्वी मात करत जगाला आदर्श दाखवून दिला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत