Brazil Is Facing A Biological Fukushima And Seeing New Covid Variants Every Week
ग्लोबल

ब्राझीलमध्ये कोरोनाचा हाहाकार, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

ब्राझीलिया : ब्राझीलमध्ये कोरोनामुळे हाहाकार उडाला असून तेथील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. जपानमधील फुकूशिमामध्ये झालेल्या अणुभट्टी अपघातासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. मंगळवारी ब्राझीलमध्ये एकाच दिवसात ४१९५ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. ब्राझीलमधील पूर्वेकडील भागात कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पथकाचे नेतृत्व करणारे मिगुएल निकोलेलिस यांनी सांगितले की, […]

baby left unit died mum partied for six days
ग्लोबल

दुःखद : बाळाला घरामध्ये विसरून आई गेली पार्टी करायला, 6 दिवसांनी घरी परतली तेव्हा…

ब्रिटनमध्ये एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एक आई तिच्या 20 महिन्यांच्या बाळाला घरामध्ये विसरून ६ दिवस पार्टी करायला निघून गेली. तिचा वाढदिवस मित्र-मैत्रिणींसह साजरा करण्यासाठी ती बाहेर गेली होती. यावेळी ती आपल्या मुलीला विसरली. सहा दिवसांनी जेव्हा ती घरी परतली तेव्हा त्या बाळाचा मृत्यू झालेला होता. या प्रकरणात महिलेला अटक करण्यात आली आहे. […]

Earth Hour will be celebrated tonight at 8.30 pm
ग्लोबल देश

आज रात्री साजरा होणार अर्थ आवर, पृथ्वीसाठी छोटंसं योगदान, जाणून घ्या…

नवी दिल्ली : दर वर्षी मार्चच्या शेवटच्या शनिवारी रात्री साडेआठ वाजता जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी लाईट बंद करतात आणि पृथ्वीच्या उन्नतीसाठी एकत्रित होतात. हा दिवस जगभर अर्थ-आवर (Earth Hour) म्हणून ओळखला जातो. यावर्षी, अर्थ आवर दिन 27 मार्च रोजी आला आहे. यानिमित्ताने जगातील 180 हून अधिक देशांतील लोक रात्री ८.30 ते ९.30 या वेळेत […]

Pakistan's Prime Minister Imran Khan infected with corona
ग्लोबल

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण, २ दिवसांपूर्वीच घेतली चिनी कोरोना लस

कराची : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी दुपारी आलेल्या डॉक्टरांच्या अहवालात हे उघड झाले आहे. पंतप्रधान इम्रान यांनी दोन दिवसांपूर्वीच (गुरुवार, 18 मार्च) चिनी सिनोफॉर्म कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. परंतु लसीकरणानंतरही त्यांना कोरोना संसर्ग झाला. पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पंतप्रधान इम्रान त्वरित आपल्या निवासस्थानी गेले आणि […]

earthquake in many parts of northern india including delhi
ग्लोबल

ब्रेकिंग : जपानमध्ये 7.2 क्षमतेच्या तीव्र भूकंपाचे धक्के, त्सुनामीचा इशारा

टोकियो : पूर्वोत्तर जपानमध्ये 7.2 क्षमतेच्या तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर जपानच्या हवामान संस्थेने १ मीटरच्या त्सुनामीची शक्यता वर्तवली आहे. मियागी प्रदेशात हा भूकंप झाला आहे. मियागीमधून नुकसानीची कोणतीही माहिती आली नाही. मात्र, या प्रदेशाच्या अणु प्रकल्पांच्या स्थितीची पाहणी करण्यात येत आहे, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले. M7.2 Strong earthquake in Tohoku, Shindo 5強 (Strong) Tsunami […]

President Joe Biden lost his footing while climbing up the steps to Air Force One
ग्लोबल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा विमानात चढताना तीन वेळा तोल गेला, व्हिडिओ होतोय व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन शुक्रवारी एअरफोर्स वन या विमानात चढताना पायऱ्यांवरून तीन वेळा घसरले. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. एअरफोर्स वनमध्ये चढताना बायडन पायऱ्यांवरून घसरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अटलांटा येथे या आठवड्याच्या सुरुवातीला सामूहिक गोळीबार झाला. याबाबत आशिया-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी बायडन यांना या विमानातून अटलांटा येथे जायचं […]

Big TV set fell on a journalist in a live show
ग्लोबल

पत्रकारावर लाईव्ह कार्यक्रमात पडला मोठा टीव्ही सेट, व्हिडिओ व्हायरल

कोलंबियामधून एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. इथे लाईव्ह कार्यक्रमात स्टुडिओमधील एका पत्रकारावर एक मोठा टीव्ही सेट पडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने त्या पत्रकाराला जास्त दुखापत झालेली नाही. ही घटना टीव्ही चॅनल ईएसपीएन कोलंबियामध्ये काम करणारे पत्रकार कार्लोस ऑर्डुज यांच्याबरोबर घडली आहे. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या कार्यक्रमादरम्यान […]

skydiver died parachute failed to deploy during competition
ग्लोबल

भयंकर : स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान पॅराशूट न उघडल्यामुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

ऑस्ट्रेलिया : स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान पॅराशूट न उघडल्यामुळे एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तथापि, हा तरुण खूपच अनुभवी स्कायडायव्हर होता. रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पर्थच्या उत्तरेकडील ज्युरियन बे येथे व्हर्च्युअल नॅशनल स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान हा अपघात झाला. वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील ज्युरियन बे येथे स्कायडायव्हिंग स्पर्धेत एका तरुणाने सहभाग घेतला होता. सोलो विंगसूट परफॉर्म करताना त्याने […]

The owner of the company that built the Raphael aircraft died in a helicopter crash
ग्लोबल

राफेल लढाऊ विमाने तयार करणाऱ्या कंपनीच्या मालकाचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू

राफेल लढाऊ विमाने तयार करणाऱ्या कंपनीचे मालक ओलिवियर दसॉल्ट यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. ते ६९ वर्षांचे होते. दसॉल्ट फ्रान्सच्या संसदेचे सदस्यदेखील होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दसॉ यांना श्रद्धांजली अर्पण करताना, फ्रान्सची सतत सेवा करणारं व्यक्तीमत्व हरवल्याची भावना व्यक्त केली. दसॉ यांच्या खासगी हेलिकॉप्टरला नॉर्मंडी परिसराजवळ अपघात झाला. ओलिवियर दसॉल्ट यांच्या हेलिकॉप्टरचा […]

The bomb of World War II detonated eight decades later
ग्लोबल

तब्बल आठ दशकांनंतर फुटला दुसर्‍या महायुद्धातील बॉम्ब.. पहा थरारक व्हिडीओ…

लंडन : इंग्लंडच्या एक्स्टर शहरात तब्बल आठ दशकांनंतर दुसर्‍या महायुद्धातील बॉम्ब आढळला. त्यानंतर इंग्लंडमधील एक्स्टर शहर रिकामे करण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धातील या महाविनाशक बॉम्बला रविवारी निकामी करण्यात आले. रिमोट कंट्रोल द्वारे या बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात आला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की काही किलोमीटर दूरपर्यंत असलेल्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या बॉम्बची माहिती मिळताच, घटनास्थळावर […]