Brazil Is Facing A Biological Fukushima And Seeing New Covid Variants Every Week

ब्राझीलमध्ये कोरोनाचा हाहाकार, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

ग्लोबल

ब्राझीलिया : ब्राझीलमध्ये कोरोनामुळे हाहाकार उडाला असून तेथील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. जपानमधील फुकूशिमामध्ये झालेल्या अणुभट्टी अपघातासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. मंगळवारी ब्राझीलमध्ये एकाच दिवसात ४१९५ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ब्राझीलमधील पूर्वेकडील भागात कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पथकाचे नेतृत्व करणारे मिगुएल निकोलेलिस यांनी सांगितले की, ब्राझील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटाशी दोन हात करत आहे. त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटले की सध्याचे संकट गंभीर आहे. अणूभट्टीच्या अपघातासारखे असून संकट आता नियंत्रणाबाहेर आहे. जपानमध्ये २०११ मध्ये आलेल्या भीषण त्सुनामीनंतर अणूभट्टीत अपघात झाला होता. मिगुएल यांनी सांगितले की, ब्राझील हे जगभरातील संसर्गाचे केंद्र नाही. मात्र, ब्राझीलमधील कोरोनावर नियंत्रण न मिळवल्यास जगातील इतर देशांमध्येही त्याला नियंत्रित करणे कठीण होईल, असा इशारा त्यांनी दिला. दर आठवड्याला कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत