The couple murdered their own daughters

किरकोळ भांडणात तीन वर्षांच्या चिमुकलीने घेतली वडिलांची बाजू, आईने केली मुलीची हत्या

क्राईम देश

बंगळुरु : आई-वडिलांच्या टीव्हीच्या रिमोटवरुन झालेल्या भांडणात तीन वर्षांच्या चिमुकलीने जीव गमावला. मुलीने वडिलांची बाजू घेतल्यामुळे आईला राग अनावर झाला आणि तिने आपल्या तीन वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. कर्नाटकातील बंगळुरुमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सुधा पश्चिम बंगळुरुतील टाईल्सच्या दुकानात हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून कार्यरत होती. तर तिचा पती इरन्ना हा माथाडी कामगार आहे. ही चिमुकली नेहमीच आपल्या वडिलांची बाजू घेत असायची. त्यामुळे तिची आई सुधा (26) नेहमी चिडलेली असायची. अशातच टीव्हीच्या रिमोटवरुन पती-पत्नीत वाद झाला. या वादानंतर या चिमुकलीने वडिलांची बाजू घेतली. त्यामुळे तिच्या आईला राग अनावर झाला. अखेर या महिलेने चिमुकलीला जीवे मारायचं ठरवलं आणि एका बांधकाम सुरु असलेल्या निर्मनुष्य इमारतीत नेलं. तिथे तिने आपल्या मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर पतीसोबत पोलिस स्थानकात जाऊन या महिलेने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मी मुलीला घेऊन चाटच्या दुकानात गोबी मंचुरिअन खायला गेले होते. दुकानदाराला पैसे देत असताना माझ्या नकळत चिमुकली हात सोडून कुठेतरी गेली, असं तिने रचला.

दुसऱ्या दिवशी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत चिमुकलीचा मृतदेह आढळला. त्याविषयी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सुधा आणि इरन्ना यांना बोलावून मुलीची ओळख पटवण्यात आली. मात्र सुधाच्या बोलण्यात तफावत आढळल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी तिची कसून चौकशी केली, तेव्हा सुधाने आपणच मुलीची गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. मुलगी नेहमी आपल्या वडिलांची बाजू घेत असल्याच्या रागातून तिची हत्या केल्याचं सुधाने सांगितलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत